शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 2:25 PM

1 / 5
वेळेवर भूक लागणे ही एक हेल्दी बॉडी आणि पचनक्रियेचे संकेत आहेत. पण काय तुम्हाला दिवसातून अनेकदा भूक लागते? किंवा तुमच्या सततच्या खाण्यामुळे तुम्हाला मित्र बकासुर म्हणायला लागले आहेत? तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर अशात ही स्थिती तुमच्यासाठी अधिक नुकसानकारक ठरु शकते. सतत खाणं हे आरोग्यासाठीही हानिकारक असतं. योग्य आहार आणि योग्य फिटनेस रूटीन शरीराचं अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु असे काही पदार्थ आहेत जे भूक कमी करण्यासाठी मदत करतात. जर तुम्हालादेखील तुमच्या भूकेवर नियंत्रण ठेवणं कठिण होतय? तर हे पदार्थ तुम्हाला ओवरइटिंगपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
2 / 5
मिरची फक्त जेवण रूचकर बनवत नाही तर पोट भरण्यासाठीही मदत करते. यामुळे तुम्ही अधिक जेवण्याच्या सवयीपासून सुटका करून घेऊ शकता. लाल मिरची भूक नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये कॅप्सॅकिन नावाचं यॉगिक असतं. जे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवतं. कॅप्सॅकिनमुळे गोड आणि फॅटी पदार्थांसाठी लागणारी भूक नियंत्रित करण्यास मदत करतं.
3 / 5
लसूण भूक नियंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. लसणाचं सेवन केल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. याव्यतिरिक्त लसणाचं सेवन केल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होते.
4 / 5
दालचीनी फक्त भूक नियंत्रित करण्याचं काम करत नाही तर शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न करण्याचं देखील काम करते. दालचीनीच्या सेवनाने मेटाबॉलिज्म वाढतं. याव्यतिरिक्त धमण्या स्वच्छ ठेवून खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचंदेखील काम करते.
5 / 5
रतांब्यापासून कोकम तयार करण्यात येतं. भूकेवर कंट्रोल करण्यासाठी सर्वात उपयोगी ठरतं कोकम. जर तुम्ही जेवण्याआधी याचा वापर करत असाल तर दिर्घकाळ तुमचं पोट भरल्यासारखं जाणवतं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य