शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 6:38 PM

1 / 10
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाची लागण होण्यापासून लोकांना वाचवण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. पण कोरोनाचा प्रसार कमी होत नाही, अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे कामधंदे ठप्प पडले आहेत. त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. सध्याची स्थिती पाहता आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार असं चित्र दिसून येत आहे.
2 / 10
कोरोना व्हायरस घरातील एका वस्तूवर असेल तर संक्रमणाचं कारण ठरू शकतो. त्यासाठी सतत साफसफाई करणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला घरातील वस्तूंची स्वच्छता कशी ठेवावी याबाबत सांगणार आहोत. कारण येता-जाताना, बसता-उठताना घरातील फर्निचरशी संपर्क नेहमी होत असतो. त्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी.
3 / 10
सुरूवातीला वॅक्यूम क्लिनिंगच्या मदतीने तुम्ही फर्नीचरच्या खालच्या भागाची साफसफाई करून घ्या. कारण घाण, बॅक्टेरिया अशा ठिकाणी जास्तवेळपर्यंत राहू शकतात.
4 / 10
साफसफाई करण्यासाठी किटाणूनाशकाचा वापर करा. याशिवाय जंतूंना नष्ट करण्याासाठी एक लीटर पाण्यात सात ग्राम ब्लिचींग पावडर मिसळा. मग या पाण्याचा साफसफाईसाठी वापर करा
5 / 10
डिसइंफेक्टंटच्या बॉटलला खाली ठेवू नका. काही अंतरावरून साफ सफाई करण्याच्या ठिकाणी स्प्रे करा. हातात ग्लोव्हज घातल्याशिवाय साफसफाई करू नका.
6 / 10
स्प्रे करण्याआधी फर्नीचर पुसून घ्या. जर खूप जास्त धुळ असेल तर कापडाने २ ते ३ वेळा पुसून मग स्प्रे करा. स्वयंपाकघर आणि बाथरुम सिकं हे असे ठिकाण आहेत जिथे सर्वात जास्त घाण पसरण्याची शक्यता असते. स्वयंपाक घरात आणि बाथरूमला लागलेल्या सिंकला नियमाने चांगल्या अँटी-बॅक्टेरियल लिक्विडने स्वच्छ करा.
7 / 10
टीव्हीचे किंवा एसीचे रिमोट बरेच जण त्याला हाताळतात. अनेकदा जेवताना देखील त्याच हाताने रिमोट वापरण्यात येतो ज्यामुळे त्यावर घाण साचते. त्यामुळे लहान ब्रशच्या साहाय्याने रिमोटच्या बटणांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करा.
8 / 10
सध्या लोक वर्क फ्रॉम होम आहेत आणि लोकं लॅपटॉपचा वापर करीत आहेत. पण स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत नाही. म्हणून काम करण्याच्या आधी लॅपटॉप स्वच्छ करायला विसरू नका. तुम्ही जास्तीत जास्तवेळ काम करत बसता ती जागा सुद्धा स्वच्छ असावी.
9 / 10

10 / 10

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स