do not eat banana and milk together, know the side effects
केळ आणि दूध एकत्र करून खायला जालं तर कराल स्वत: चाच घात, धोके आत्ताच घ्या जाणून By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 1:53 PM1 / 10केळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन आणि पोषक घटक असतात. केळ्यात फायबर असतं शिवाय शरीराला एनर्जी मिळते आणि अनेक आजारांपासून संरक्षण होतं. दुधामध्ये कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी असतं. हे दोन्हीही पदार्थ आरोग्यदायी असले तरी, सकाळच्या नाश्त्यामध्ये केळं आणि दूध एकत्र घेत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.2 / 10बऱ्याच जणांना दूध आणि केळं स्मूदी बनवून पिण्याची सवय असते. तर, काही पदार्थ करताना त्यात केळं आणि दुध वापरलं जातं. केळं आणि दूध आरोग्यासाठी उत्तम असलं तरी, एकत्र खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं तज्ञांचे मत आहे.3 / 10दुधात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, रायबोफ्लेविंन, व्हिटॅमिन बी 12 सारखे मिनरल्स असतात. एक ग्लास दुधामध्ये जवळपास 42 कॅलरीज असतात.4 / 10केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, मॅग्नीज व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, बायोटीन सारखे व्हिटॅमिन असतात. 100 ग्रॅम वजनाच्या केळ्याच्या तुकड्यांमध्ये 89 कॅलरीज असतात. केळ खाल्ल्यामुळे पोट भरतं आणि एनर्जी मिळते. त्यामुळेच स्पोर्ट्समन आणि वर्कआऊट करणारे लोक खेळ खातात.5 / 10काही लोक वजन वाढण्यासाठी दूध आणि केळाची स्मूदी पितात मात्र, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दोघांमध्ये वेगवेगळे घटक असल्यामुळे शरीरामध्ये एकत्र पचण्यासाठी कठीण ठरतात.6 / 10काही लोक वजन वाढण्यासाठी दूध आणि केळाची स्मूदी पितात मात्र, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. दोघांमध्ये वेगवेगळे घटक असल्यामुळे शरीरामध्ये एकत्र पचण्यासाठी कठीण ठरतात.7 / 10एका संशोधनानुसार केळं आणि दूध एकत्र घेतल्यामुळे पचन व्यवस्थेवर वाईट परिणाम होतो. याशिवाय सर्दी, खोकला किंवा ऍलर्जी सारखे त्रास होऊ शकता. उलटी आणि लूज मोशन्स देखील होऊ शकतात.8 / 10आयुर्वेदानुसार फळांसोबत कोणतेही द्रवपदार्थ घेऊ नयेत असा सल्ला देण्यात आलेला आहे. आयुर्वेदानुसार केळं आणि दूध शरीरामध्ये टॉक्सिफिकेशन वाढवतं. यामुळे इतर शारीरिक क्रियांवर देखील परिणाम होतो.9 / 10केळं आणि दूध एकत्र घेतल्यामुळे शरीर जड वाटू लागतं. मेंदूवरही परिणाम होतो. उत्साह वाटत नाही, थकवा येतो.10 / 10तुम्हाला जर दूध आणि केळं खायचच असेल तर वेगवेगळं खा. वर्कआऊट केल्यानंतर किंवा करण्यापुर्वी स्नॅक म्हणून आधी दूध प्या मग २० मिनिटानंतर केळ खा. आणखी वाचा Subscribe to Notifications