do not mix these fruits with each other. know the sideeffects
ही फळे एकत्र खाल तर मृत्यूला आमंत्रण द्याल, तुम्ही विचारही करू शकत नाहीत उतके गंभीर धोके By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 3:37 PM1 / 10डॉक्टर पपई आणि लिंबाला एकत्र खाणं डेडली कॉम्बिनेशन मानतात. या दोन गोष्टी एकत्र मिळून रक्तातील हिमोग्लोबिनशी संबधित समस्या वाढवू शकतात. यामुळे अॅनिमिया (रक्ताशी संबधित रोग) होण्याचीही शक्यता असते.2 / 10गाजर आणि संत्र्याचं काँम्बिनेशन किडनीशी संबधित समस्यांना आमंत्रण देऊ शकते. यामुळे पित्त व छातीत जळजळ होऊ शकते.3 / 10जर तुम्ही पेरु आणि केळ एकत्र खाण्याची चूक करत असाल तर सावधान.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यामुळे पोटात गॅसची समस्या होऊ शकते. तसेच यामुळे डोकेदुखीही होऊ शकते.4 / 10टरबूज आणि खरबूज - उन्हाळ्यात मिळणारी ही दोन्ही फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतू ती एकत्र खाल्यास अपचन आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात.त्यामुळे हे पदार्थ सोबत खाणे टाळावे5 / 10दुधात असलेले कॅल्शियम फळांच्या पोषक तत्त्वांचे मिश्रण करते आणि त्यांचे पोषण शरीरात उपलब्ध नसते. अननस हे फळ दुधा बरोबर अजिबात घेऊ नये.6 / 10दह्यासह आंबट फळे खाऊ नका. वास्तविक, दही आणि आंबट फळांमध्ये एंजाइम असते. या कारणास्तव, त्याचे पचन होत नाही, म्हणून दोन्ही एकत्र घेणे चांगले नाही.7 / 10दुध आणि केळं – आपल्या जेवणात शिकरण हा प्रकार हमखास समाविष्ट केलेला असतो. मात्र हे दोन पदार्थ एकत्र खाणे हे धोक्याचे आहे, दोन्ही पदार्थ एकमेकांना पचण्यापासून रोखतात. दोन्ही पदार्थांच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, हे पदार्थ एकत्र खाल्यामुळे शरीराची अन्न पचण्याची प्रक्रीया बदलते त्यामुळे पोटात गॅस, अपचन निर्माण होऊन उलटी होण्याची शक्यता असते.8 / 10दुधासोबत फणस खाऊ नये. यानं फायदा नाही तर तोटाच होईल. हे एकत्र खाल्ल्यानं त्वचेचे रोग होण्याची शक्यता असते. खाज सुटणं, एग्झिमा, सोरायसीस यांसारखे त्वचेचे रोग होऊ शकतात.9 / 10संत्र हे फळं दुधातील पोषक तत्त्वं शोषून घेतं. त्यामुळे संत्र्यासारखी आंबट फळंही दुधासोबत खाऊ नका.10 / 10फळे मीठ आणि मसाल्याशिवाय खा. कारण जेव्हा आपण त्यात मीठ घालतो तेव्हा त्याला रस सुटतो व सर्व घटक बाहेर पडतात. आणखी वाचा Subscribe to Notifications