झोपताना डोक्यात अनेक विचार येतात? भरकटलेलं मन शांत करण्यासाठी करा 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:59 IST
1 / 7Better Sleep Tips: अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप न येण्याची समस्या होते. जास्तीत जास्त लोकांना रात्री झोपेवेळी मनात वेगवेगळे विचार येतात, त्यामुळेही त्यांना झोप लागत नाही. मनात सतत वेगवेगळे विचार झोपेत खोळंबा घालतात. अशात रात्री लवकर झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फ्रेशही वाटत नाही. तसेच आजारीही पडू शकता. गोळ्या घेऊन झोपल्यापेक्षा ही समस्या दूर करण्यासाठी काही गोष्टी फॉलो करू शकता. ज्यांद्वारे मन शांत करून चांगली झोप घेऊ शकता. 2 / 7झोपण्याआधी डीप ब्रीदिंग एक्सरसाईज करून मनात येणार विचार दूर पळवू शकता. मोठा श्वास घेण्याची काही वेळ एक्सरसाईज केली तर मन शांत करण्यास मदत मिळते. सोबतच शरीराला आरामही मिळतो. ही एक्सरसाईज करण्यासाठी हळू श्वास घ्या आणि काही सेकंदासाठी रोखून ठेवा. नंतर श्वास तोंडानं सोडा. ही एक्सरसाईज तुम्ही झोपण्याआधी ५ ते १० मिनिटं करू शकता. 3 / 7झोपण्याआधी काही वेळ मेडिटेशन केल्यानंही डोकं शांत करण्यासाठी मदत मिळू शकते. यासाठी डोळे बंद करा आणि श्वासांवर लक्ष केंद्रीत करा. असं ५ ते १० मिनिटं करा. यानं मन शांत होईल आणि चांगली झोपही येईल.4 / 7झोपण्याआधी सकारात्मक गोष्टींचा विचार केल्यानं चांगली झोप येण्यास मदत मिळते. तुम्हाला चांगलं वाटत असल्याचं तुमच्या मनाला सांगा. चिंतेच्या गोष्टींचा सतत विचार करू नका. असं केल्यानं मन विचलित होणार नाही.5 / 7झोपतेवेळी रूममध्ये अंधार ठेवा आणि शांतता ठेवा. असं केल्यानं मेंदुला आराम मिळतो. कसलेही आवाज येऊ नये म्हणून कानात रूई लावा. झोपण्याआधी खासकरून निळ्या प्रकाशापासून वाचा. कारण यानं मेलाटोनिनच्या प्रोडक्शनवर प्रभाव पडतो.6 / 7तुम्हाला जर रात्री लवकर झोप येत नसेल तर एखादं तुमच्या आवडीचं चांगलं पुस्तक वाचा. यानं डोक्यात विचार येणार नाहीत आणि वाचता वाचता तुम्हाला चांगली झोपही लागेल.7 / 7जर दिवसभर तुमच्या मनात चिंता राहत असेल, भविष्य आणि भूतकाळातील गोष्टी सतावत असतील तर झोपण्याआधी डायरी लिहिण्याची सवय लावा. असं केल्यानं मनातील गोष्टी बाहेर येतील आणि तुम्हाला शांत वाटेल.