शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्ही दररोज ८ ग्लास पाणी पिता का?; ‘या’ आजाराचा धोका वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 6:12 PM

1 / 10
पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, पाणी आपल्या शरीराला हायड्रेट करण्याचं काम करते. विशेषतः उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज खूप जास्त असते. पण काही लोक खूप कमी पाणी पितात किंवा त्यांना पाणी पिल्याचे आठवत नाही.
2 / 10
तुम्हीही असेच काही करत असाल तर समजून घ्या, पाणी न पिण्याचा तुमच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो आणि तुम्हाला खूप धोकादायक आजार होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त पाणी गरजेचे आहे. पाणी न पित नसाल तर त्याचे परिणाम जाणून घ्या.
3 / 10
वैद्यकीत तज्ज्ञ म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने दररोज ६ ते ८ ग्लास पाणी प्यावे. असे केल्याने हार्ट फेल्युअर सारखा धोकादायक आजार टाळता येतो. जेव्हा हृदय शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त योग्यरित्या पोहोचवू शकत नाही तेव्हा हार्ट अटॅक येऊ शकतो.
4 / 10
हे सहसा हृदयाच्या कमकुवतपणामुळे होते. ही एक दीर्घकाळ चालणारी समस्या आहे जी कालांतराने अधिक धोकादायक ठरू शकते. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधक डॉ. नतालिया दिमित्रीवा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
5 / 10
त्यांनी सांगितले की, या सर्व गोष्टी केल्याने दीर्घकाळ चालणाऱ्या हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो, या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी डॉ. नतालिया यांनी एक टीम तयार केली. ज्यांनी १२ हजार अमेरिकन प्रौढ व्यक्तींचा अभ्यास केला.
6 / 10
या अभ्यासात ४५ ते ६६ वयोगटातील लोकांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासाच्या सुरुवातीला या सर्व लोकांना हृदय, मधुमेह आणि लठ्ठपणाशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. सुमारे १३६६ लोकांना हृदयविकाराचा त्रास झाला, जो वयानुसार सामान्य आहे.
7 / 10
टीमने रक्तातील सोडियम पातळीचा अंदाज लावला जो एखाद्या व्यक्तीच्या शरीरात द्रव पातळी कमी झाल्यामुळे वाढू शकतो. एक सामान्य सीरम सोडियम श्रेणी १३५ आणि १४६ मिली समतुल्य प्रति लिटर (mEq/L) दरम्यान असते. परंतु ज्या लोकांची सोडियम पातळी त्यांच्या मध्यम आयुष्यात सुमारे १४३ mEq/L च्या दरम्यान असते
8 / 10
यातील हार्ट फेलियर धोका ३९ टक्के जास्त असतो. डेटामध्ये असेही दिसून आले आहे की ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि सोडियमची श्रेणी १४३ mEq/L असलेल्या लोकांच्या हार्टचे अस्तर जाड झाल्याचे आढळले आहे. या लोकांमध्ये हा धोका ६२ टक्के जास्त असतो.
9 / 10
द्रवपदार्थ, मग ते चहा, पाणी किंवा कोणतेही पेय असो, शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ घेतल्याने, हृदय शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त चांगल्या प्रकारे वाहून नेण्याचे कार्य करते. प्राथमिक निष्कर्ष असे सूचित करतात की चांगल्या हायड्रेशनमुळे शरीरातील बदल टाळता येतात ज्यामुळे हार्ट फेलियरचा धोका वाढतो.
10 / 10
रक्तवाहिन्यांच्या कार्यासाठी शरीर हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, महिलांनी दररोज ६ ते ८ (१.५-२.१ लिटर) कप पाणी प्यावे आणि पुरुषांनी दररोज ८ ते १२ (२-३ लिटर) कप पाणी प्यावे. याव्यतिरिक्त, तज्ञ नियमित व्यायाम, धूम्रपान न करणे, अल्कोहोल आणि कॅफिनचे मध्यम सेवन आणि हृदयाच्या काळजीसाठी निरोगी आहाराचा सल्ला देतात.
टॅग्स :Waterपाणी