do you feel angry all the time hunger may be the reason know how to get over it
भुकेमुळे राग होतो अनावर?; मग करा हे उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 4:35 PM1 / 5प्रत्येक तासाला पाणी प्या : प्रत्येक तासाला पाणी प्यायल्यास पोट भरलेले राहतं आणि शरीरात पाण्याची पातळीदेखील समतोल प्रमाणात राहते. महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यावे. 2 / 5जेवणात दालचीनीचा समावेश करावा : मसल्यांमधील दालचीनी शरीरातील साखरेचं प्रमाण समतोल राखण्याचं प्रयत्न करते. यामुळे पचनक्रिया धीम्या गतीनं होते. शिवाय, यानिमित्तानं आरोग्यास हानिकारक असे पदार्थ खाणंदेखील टाळलं जाऊ शकतं.3 / 5साखर वर्ज्य करा : साखरेमुळे शरीरातील ऊर्जा ज्या गतीनं वाढते त्या गतीनं ऊर्जा कमीदेखील होते. यामुळे जेव्हा शरीरातील साखरेची पातळी कमी होते, त्यावेळेस झोप येऊ लागते. शिवाय, साखर खाल्ल्यानंतर थोड्या वेळानं भूकदेखील लागते. 4 / 5ज्यूसऐवजी फळांचं सेवन करा : ज्यूसऐवजी फळं खा. फळांमुळे पोट भरलेले राहते. शिवाय ज्यूस करताना अनेकदा त्यात साखर वापरली जाते. साखर शरीरासाठी अपायकारक आहे. साखरेचे शरीरावर दुष्परिणाम होतात. 5 / 5सावकाश जेवण करा : प्रत्येक घास चावून खाल्ल्यास, याचा चांगला फायदा शरीरास मिळते. खाद्यपदार्थांचे पचन योग्य होते आणि पोटाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications