Do you know when 'shock' is given to a mental patient?
मानसिक रुग्णाला ‘शॉक’ कधी दिला जातो माहितेय? By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 1:20 PM1 / 10मानसिक आरोग्याच्या उपचारात विविध टप्प्यांवर रुग्ण औषधोपचार, थेरपीला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात त्याप्रमाणे उपचार पद्धतीत डॉक्टर बदल करत असतात. विशेष मानसिक आजार असणाऱ्या काही रुग्णांना खूप काळ उपचार द्यावे लागतात. 2 / 10कारण त्यांच्या आजाराने बऱ्यापैकी तीव्र स्वरूपाचे रूप धारण केलेले असते. काही वेळा रुग्ण इतके उग्र रूप धारण करतात की ते स्वतःला किंवा समोरच्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवू शकतात. ते काही वेळा रुग्णाच्या जीवावरही बेतू शकते. 3 / 10या अशा वेळी रुग्णांना काही वेळा उपचाराचा भाग इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (सामान्य भाषेत इलेक्ट्रिक शॉक) दिली जाते. मानसिक आजाराच्या रुग्णांना जर वेळीच उपचार मिळाले तर ते या आजारातून लवकर बरे होतात. त्यामुळे जर एखाद्या रुग्णामध्ये मानसिक आजाराचे लक्षण आढळून आल्यास त्यांना तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवून घ्यावे. 4 / 10इंजेक्शनने रुग्ण होतो बरा सध्याच्या घडीला मानसिक आजारावरील चांगली औषधे उपलब्ध झाली आहेत. अनेकवेळा वेळेत औषधोपचार घेतल्यामुळे रुग्ण काही काळात ठणठणीत बरे होतात. सर्वसामान्य सारखे ते आयुष्य जगू शकतात. 5 / 10कोणाला दिला जातो शॉक? हे संपूर्णपणे जो मानसोपचार तज्ज्ञ रुग्णावर उपचार करत आहे तो योग्य वेळी हा शॉक देतो. त्याचा निर्णय तो घेत असतो. 6 / 10 रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसेल आणि रुग्ण स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करून घेऊ शकतो त्यावेळी शॉक दिला जातो. 7 / 10 विशेष करून स्किझोफ्रेनिया, बायपोलार मॅनिया, तीव्र नैराश्य या आजारांमध्ये शॉक थेरपी दिली जाते, मात्र याचा सर्वस्वी निर्णय डॉक्टरांचा असतो. 8 / 10मानसिक आजाराची लक्षणे काय? कोणाशीही बोलण्याची इच्छा न होणे आत्महत्या करण्याचा विचार येणे नैराश्य येणे- निराश होणे एकाग्रता कमी होणे थकवा जाणवणे सतत नकारात्मक विचार येणे निद्रानाश भूक न लागणे इतरांत सहभागी न होणे 9 / 10ज्यावेळी रुग्ण आत्महत्या करण्याच्या तयारीत असतो, ती लक्षणे डॉक्टरांना कळत असतात. त्यावेळी शॉक थेरपी संजीवनी म्हणून काम करते. पूर्वी हे उपचार ॲनेस्थेशियाशिवाय केले जायचे. मात्र आता रुग्णांना ॲनेस्थेशिया दिला जातो आणि मग शॉक थेरपी दिली जाते. 10 / 10२ ते ३ मिनिटांचे हे उपचार असतात. मात्र काही रुग्णांची परिस्थिती ज्यावेळी अतिशय बिकट असते, त्यावेळी डॉक्टर या थेरपीचा वापर करतात. तसेच या थेरपीमुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. शॉक थेरपी डोक्यातील न्यूरोट्रान्समीटरवर काम करते. - डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ज्ञ आणखी वाचा Subscribe to Notifications