Doctor: Why do doctors always wear white coat? That is the reason behind it
Doctor : डॉक्टर नेहमी पांढऱ्या रंगाचा कोट का वापरतात? असं आहे त्यामागचं खास कारण By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 1:58 PM1 / 5रुग्णालयातील क्लिनिकमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ नेहमी पांढऱ्या रंगाचा कोट वापरत असल्याचे तुम्ही पाहत असाल. मात्र डॉक्टर हे नेहमी पांढऱ्या रंगाचेच कपडे का वापरत असत, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? मात्र यामागे मोठं विज्ञान आहे. याचा थेट संबंध रुग्ण आणि डॉक्टरांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. डॉक्टर आणि नर्स नेहमी पांढऱ्या रंगाचा कोट का घातलतात, याचं कारण जाणून घ्या... 2 / 5कोट पांढरा असल्याने तो संसर्गापासून वाचवतो. पांढऱ्या कोटवर रक्त आणि केमिकलचा डाग स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे रुग्णापासून डॉक्टर आणि इतर व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. त्यावर रक्त किंवा अन्य केमिकलचा डाग दिसल्यावर त्वरित बदलता येतो. 3 / 5संसर्गापासून वाचण्यासाठी पांढऱ्या रंगाचा कोट वापरण्याची इतर अनेक कारणे आहेत. त्यामधील एक म्हणजे असा कोट वापरणारी व्यक्ती ही डॉक्टर किंवा मेडिकल स्टाफ आहे, हे समजून येते. त्यामुळे रुग्ण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखू शकतात. त्याशिवाय पांढरा कोट हा स्वच्छतेचेही प्रतिक आहे. 4 / 5पांढरा कोट वापरण्याबाबत डॉक्टरांना विचारले असता या सर्वेमधून त्याबाबतचं डॉक्टरांचं मत अधिक स्पष्ट झालं आहे. त्यानुसार सर्वेत सहभागी झालेल्या डॉक्टरांनी पाढऱ्या कोटमुळे ७० टक्क्यांपर्यंत संसर्ग थांबू शकतो. 5 / 5पांढऱ्या रंगाच्या कोटबाबत रुग्ण काय विचार करतात, याबाबतही एक रिसर्च समोर आला आहे. त्यामध्ये विशेष करून जेष्ठ नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यातील ज्येष्ठ नागरिकांना वाटते की, पांढरा रंग हा बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे. डॉक्टरच्या पांढऱ्या कोट परिधान करण्यामुळे रुग्णांना सहज वाटू शकते. तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही जागृत होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications