Does the blue mask, N95 mask protect against corona? Find out before you get infected ...
Corona Mask: निळा मास्क कोरोनापासून बचाव करतो? जाणून घ्या लागण होण्यापूर्वी... By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 11:40 AM1 / 10कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) बचावासाठी लोक अनेक प्रकारचे मास्क (Mask) वापरतात. कापडाचा मास्क (Cotton Mask) सर्रास वापरला जातो. त्यात मेडिकलमध्ये मिळणारा सर्जिकल मास्क (surgical face masks) किंवा निळा मास्क 5 ते 10 रुपयांना मिळतो. मात्र, हा मास्क कोरोनापासून बचाव करत नाही. (Blue surgical face masks are only 10% effective in preventing COVID infection, new study finds)2 / 10लक्षात घ्या, नुसता मास्क लावला म्हणजे कोरोनापासून बचाव होत नाही. तर चांगला परिणामकारक मास्क घालावा लागेल. कॅनडाच्या वॉटरलू विद्यापीठाने एक अभ्यास केला आहे. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. 3 / 10यामध्ये एन 95 (N95) आणि KN95 मास्क निळ्या मास्कच्या तुलनेत जास्त एअरोसोल म्हमजेच तोंडातील किंवा श्वासातून निघणारे अत्यंत सूक्ष्म कण रोखतात. 4 / 10तर दुसरीकडे निळे मास्क हे कोरोना रोखण्यासाठी 10 टक्के परिणामकारक दिसून आले. प्रोफेसर सरही यारूसेविच यांनी सांगितले की, एअरोसोल रोखण्यासाठी वेगवेगळ्या मास्कमध्ये वेगवेगळे अंतर आहे. 5 / 10यारूसेविच आणि त्यांच्या टीमने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जे मास्क चेहऱ्याला फिट बसत नाहीत ते मास्क अनेकजण लावतात. N95 मास्क चेहऱ्याला एकदम फिट बसतो. 6 / 10कपड्याच्या मास्कमुळे एअरोसोल बाहेरही पडू शकतात. यामुळे जर तुम्हाला कोरोना झाला असेल आणि जर तुम्ही कपड्याचा मास्क लावला असेल तर त्याद्वारे इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. 7 / 10N95 50% पेक्षा जास्त एअरोसोल फिल्टर करू शकतो. बाकीचे इकडे तिकडे पसरतात आणि धोका कमी होतो. यामुळे मेडिकल प्रॅक्टिशनर N95 मास्क घालतात कारण ते जास्त परिणामकारक असतात. आम्ही या अभ्यासामध्ये यामागची ठोस कारणे आणि डेटा दिला आहे, असे यारूसेविच यांनी सांगितले. 8 / 10मास्क घालताना लोक व्हेंटिलेशनचा म्हणजेच श्वास घेताना त्रास होईल हा विचार करतात. मात्र, एन ९५ मध्ये चांगल्याप्रकारचे व्हेंटिलेशन होते, हे अभ्यासात समोर आले आहे. तसेच सुरक्षादेखील मिळते. 9 / 10अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे माजी सल्लागार मायकल ऑस्टरहोम यांनी सांगितले की, कापडाने चेहरा झाकणे खूप परिणामकारक नाही, लोकांनी एन 95 मास्क घालायला हवेत. 10 / 10जर तुम्ही N95 किंवा थ्री-प्लाई मास्क वापरत असाल तर डबल मास्क लावण्याची गरज नाही. डबल मास्किंगमुळे जास्त सुरक्षा मिळते आणि सिंगल मास्कच्या तुलनेत ते जास्त फिट बसते. परंतू N95 असेल तर दुसऱ्या मास्कची गरज नाही, असे मॅक्स हॉस्पिटलचे HOD डॉक्टर विवेक नांगिया यांनी सांगितले आहे. (Popular blue surgical face masks NOT stop people infected COVID-19) आणखी वाचा Subscribe to Notifications