Don't be afraid of monkeypox; Stay alert, Health Department issued an alert
मंकीपॉक्सला घाबरू नका; सतर्क राहा, आरोग्य विभागाकडून सूचना जारी By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 1:07 PM1 / 8मुंबई : जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून आल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. 2 / 8मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याचा अवलंब करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत. 3 / 8या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रतिबंध व उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. 4 / 8यामध्ये सर्व विमानतळ, बंदरे आणि आरोग्य युनिट्सना सतर्क करणे, चाचणी प्रयोगशाळा तयार करणे, तपासणीसाठी आरोग्य सुविधा तयार करणे, मंकीपॉक्सचा एखादा रुग्ण सापडल्यास तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, याचा समावेश आहे.5 / 8मंकीपॉक्स देशात किंवा राज्यात आलेला नाही. या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या देशांतून परत आलेल्या प्रवासी नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. स्थानिक आरोग्य यंत्रणेने कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्वेक्षण प्रतिबंधात्मक व नियंत्रणविषयक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.6 / 8मंकीपॉक्स हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैर्सगिक स्रोत आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी १ ते २ दिवसांपासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत, बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो. 7 / 8मंकीपॉक्स हा प्रामुख्याने माणसापासून माणसाला होणारी लागण जसे की, थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्राव, बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळ बाधित व्यक्तीचे संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे संसर्ग होऊ शकतो. 8 / 8त्याचप्रमाणे, प्राण्यांपासून माणसालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications