Drink habit: Why does a person get addicted to alcohol? Big revelation from research
Drink habit: माणसाला दारुचे व्यसन का लागते? संशोधनातून मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 11:34 AM1 / 9कोणत्याही प्रकारचे व्यसन हे वाईटच असते. एकदा का व्यसन लागले की ते पाठ सोडत नाही. त्यातून गुन्हे, आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या घटना घडतात. आपण दररोज अशा घटना ऐकतो. आता याच दारुची नशा का चढते आणि व्यसन कसे लागते याचा खुलासा संशोधनातून झाला आहे. 2 / 9माकडे नेहमी अशा फळांच्या शोधात असतात जी फळे थोडी शिळी झाली असतील किंवा सडली असतील. संशोधनात माकडांनी खाल्लेल्य़ा फळांमध्ये २ टक्के दारूचे अंश उपलब्ध असतात, असे आढळले आहे. 3 / 9हा अभ्यास Royal Society Open Science च्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. बर्कलीच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या बायोलॉजिस्ट रॉबर्ट डुडले यांनी २५ वर्षे यावर संशोधन केले आहे. त्यांनी माणसामध्ये दारुविषयीचे प्रेम कसे काय निर्माण होते, यावर हा अभ्यास केला आहे. 4 / 9२०१४ मध्ये त्यांनी यावर एक पुस्तकही लिहिले आहे. याचे नाव The Drunken Monkey: Why We Drink and Abuse Alcohol आहे. यामध्ये त्यांनी माणसांचे दारूवर असलेले प्रेम हे माकडे आणि लंगुरांची देणगी असल्याचे सूचित केले आहे.5 / 9वाइनच्या सुगंधामुळे माकडे आणि लंगूर फळे पिकण्याची वाट पाहतात. त्यांना फळांमध्ये अल्कोहोलचे अंश सापडतात. आता मानवांमध्ये दारूचे प्रेम जाणून घेण्यासाठी एक नवीन अभ्यास करण्यात आला आहे. जे 'ड्रंकन मंकी' या गृहीतकाचे समर्थन करते.6 / 9कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे. त्यांनी पनामामध्ये सापडलेल्या काळ्या हाताच्या कोळी माकडाची खाल्लेली फळे आणि मूत्र यांचे नमुने गोळा केले.7 / 9अभ्यासात असे आढळून आले की माकडांना जोबोची काही कुजलेली फळे खायला आवडतात. त्यात अल्कोहोलचे प्रमाण १ ते २ टक्के होते. जे केवळ नैसर्गिक किण्वनातून आले. हे प्रमाण कमी-अल्कोहोल बीअर सारखे आहे. याशिवाय माकडांच्या मूत्रात अल्कोहोलचे अंशही आढळून आले आहेत. यावरून ते ऊर्जेसाठी दारूचा वापर करतात, असा निष्कर्ष काढण्यात आला.8 / 9संशोधनात सहभागी असलेल्या क्रिस्टीना कॅम्पबेल म्हणाल्या - मानवासारखी माकडं अल्कोहोलयुक्त फळं खातात हे आम्ही पहिल्यांदाच सिद्ध करू शकलो आहोत. हा फक्त पहिला अभ्यास आहे. यावर अजून काम करण्याची गरज आहे. पण या अभ्यासानंतर असे दिसते की 'ड्रंकन माकड' या गृहीतकात नक्कीच काही तथ्य आहे.9 / 9माणसांमध्ये दारू पिण्याची इच्छा माकड खातात ती फळे खाल्ल्याने तर आली नाही ना हे जाणून घेणे हा या अभ्यासाचा उद्देश आहे. आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यात कसा बदल होतो? हे देखील पहायचे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications