शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वेगाने वजन कमी करण्यासाठी नारळाचं पाणी; जाणून घ्या कसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 3:46 PM

1 / 8
नारळाचं पाणी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे असतात. नारळाचं पाणी सेवन केल्याने केवळ ब्लड सर्कुलेशन चांगलं राहत असं नाही तर इतरही समस्यांपासून बचाव होतो. नारळाचं पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते, सोबतच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
2 / 8
एका नारळात साधारण २०० मिलीलीटर किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाणी असतं. लो कॅलरी असलेल्या नारळाच्या पाण्यात अॅंटीऑक्सिडेंट्स, अमीनो-अॅसिड, इजांइम्स, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी आणि इतरही अनेत तत्व आढळतात. जर तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनामुळे हैराण असाल तर नारळाचं पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.
3 / 8
वजन वाढलेल्या लोकांना जर वजन कमी करायचं असेल तर त्यांच्यासाठी नारळांचं पाणी चांगला पर्याय ठरु शकतं. एक कप नारळाच्या पाण्यात केवळ ४६ कॅलरी असतात. कमी कॅलरीसोबतच हे पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतं आणि वजन कमी करण्यासही मदत करतं.
4 / 8
नारळाच्या पाण्यात नैसर्गिक इंजाइम्स आणि मिनरल्स आढळतात, जे पचनक्रिया अधिक मजबूत करतात आणि शरीराचं मेटाबॉलिज्मही वाढवतं. मेटाबॉलिज्म मजबूत केल्याने कॅलरी लवकर बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
5 / 8
नारळाचं पाणी प्यायल्याने पोट लगेच भरतं आणि भूक लागत नाही. हेल्थ एक्सपर्टनुसार, दिवसातून कमीत कमी ३ ते ४ वेळा नारळाचं पाणी प्यायल्याने अधिक फायदा होतो.
6 / 8
अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की, ज्यूसच्या तुलनेत नारळाच्या पाण्यात कमी कॅलरी असण्यासोबतच शुगरचं प्रमाणही खूप कमी असतं. त्यामुळे हे तुमच्या डाएटमध्ये सामिल करुन वजन कमी करु शकता.
7 / 8
वजन कमी करण्यासोबतच नारळाचं पाणी आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. जेव्हा थायरॉईड ग्लॅड योग्यप्रकारे हार्मोन्सची निर्मिती करु शकत नाही तेव्हा शरीराचं मेटाबॉलिज्म रेट कमी होतं. पण नारळाच्या पाण्याने थायरॉईड ग्लॅड योग्यप्रकारे काम करतं आणि मेटाबॉलिज्म चांगलं राहतं.
8 / 8
किडनी निरोगी ठेवण्यासाठी नारळाचं पाणी फार फायदेशीर आहे. हे पाणी युरीनरी ट्रॅकला स्वच्छ ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतं. तसेच याने किडनी स्टोन होण्याचाही धोका कमी होतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स