Drinking Hot Tea May Lead To Esophageal Cancer Says Study
गरमागरम चहा पिताय?; मग 'हे' नक्की वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 2:27 PM1 / 6अनेकांना गरमागरम चहा पिण्याची सवय असते. मात्र यामुळे इसॉफेगस कॅन्सर होण्याचा धोका असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. 2 / 6गरमागरम चहा पिण्याची सवय प्यायला अनेकांना आवडतो. या चहाचं तापमान साधारणत: 75 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. 3 / 6काहीजण चहा कपात ओतल्या ओतल्या लगेच पिण्यास सुरुवात करतात. मात्र असं न करता 4 मिनिटं चहा थांबल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. 4 / 6अमेरिकेच्या कॅन्सर सोसायटीचे मुख्य लेखक फरहद इस्लामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरमागरम चहा किंवा अन्य पदार्थांचं सेवन कॅन्सरचं कारण ठरू शकतं. यामुळे इसॉफेगस कॅन्सर होऊ शकतो. 5 / 6जवळपास 50,045 लोकांचा या अभ्यासात विचार करण्यात आला. त्यांचं वय साधारणत: 40 ते 75 वर्षांच्या दरम्यान होतं. चहा प्यायल्यानं ग्रासनली कॅन्सरचा धोका 90 टक्क्यांनी वाढतो, असा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला. 6 / 6ग्रासनली कॅन्सर हा देशातील सहाव्या क्रमांकाचा मोठा कॅन्सर आहे. यामध्ये महिलांचं प्रमाण मोठं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications