शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गारगार वाटतं म्हणून उन्हाळ्यात पिऊन नका जास्त बिअर, होतील 'हे' गंभीर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 3:57 PM

1 / 7
उन्हाळा सुरू झाला की, मद्यसेवन करणारे लोक इतर मद्याऐवजी बिअर जास्त पितात. उन्हामुळे हैराण झालेले मद्यसेवन करणारे लोक थंड होण्यासाठी बिअर पितात. पण तुम्ही जर थंड वाटण्यासाठी किंवा उष्णता घालवण्यासाठी बीअरवर बिअर पित असाल तर चूक करताय. उन्हाळ्यात जास्त बिअर प्यायल्याने काय नुकसान होतं हेच आज आम्ही सांगणार आहोत.
2 / 7
1) बरेच लोक उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी किंवा उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून बीअरचं भरपूर सेवन करतात. बरेच लोक तहान भागवण्यासाठी बिअर पितात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, जास्त बिअर प्यायल्याने तहान भागत नाही तर वाढते. तसेच घामही जास्त जातो.
3 / 7
2) बिअर प्यायल्यानंतर भलेही काही वेळासाठी तुम्हाला थंड जाणवत असेल, पण शरीरात अल्कोहोल गेल्यावर एड्रिनलिनचा स्त्रावही वाढतो. ज्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने होऊ लागतात आणि रक्तवाहिन्याही पसरतात.
4 / 7
3) अल्कोहोलमुळे किडनी उत्तेजित होते. ज्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते. ज्यामुळे शरीरातील भरपूर पाणी निघून जातं. त्याशिवाय अल्कोहोल रक्तात मिक्स होऊन रक्त घट्ट करतं.
5 / 7
4) बरेच लोक बिअरसोबत चिकन तंदुरी किंवा चिकन फ्रायसारखे पदार्थ खातात. पण असं केल्याने गाउट किंवा कॅन्सरचाही धोका होऊ शकतो.
6 / 7
5) फार चील्ड बिअर प्यायल्याने पचन तंत्राचं तापमान फार कमी होतं. ज्यामुळे रक्तप्रवाह सुद्धा कमी होतो आणि पचन क्रिया प्रभावित होते. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात.
7 / 7
6) थंड वाटते म्हणून तुम्ही बिअर भरपूर पिता. पण याने शरीराचं नुकसानही भरपूर होतं. बिअर प्यायल्यानंतर शरीरातील भरपूर पाणी लवकर बाहेर पडतं. तर अल्कोहोल शरीरात जमा होतं. याने लिव्हर, किडनी आणि हृदय प्रभावित होतं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य