शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेहमी निरोगी राहण्याचा खजिना आहे शेवग्याच्या शेंगा, आयुर्वेदात म्हटलं जातं अमृत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:44 AM

1 / 8
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या फायदेशीर ठरत असतात. हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खास असतात. सोबतच काही शेंगाही आरोग्य चांगलं ठेवतात. यात शेवग्याच्या शेंगाचा खास उल्लेख करावा लागेल. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. चला जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे...
2 / 8
शेवग्याच्या शेंगांना म्हटलं जातं अमृत - शेवग्याच्या शेंगांना आयुर्वेदात अमृतासारखं मानलं आहे. कारण याना 300 पेक्षा जास्त आजारांचं औषध मानलं जातं. याची मुलायम पाने, फुलं आणि शेंगांची भाजी केली जाते. ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम, व्हिटामिन-ए, सी आणि बी कॉम्‍प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात.
3 / 8
1) हाडं मजबूत होतात - शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि मुबलक व्हिटॅमिन्स आढळतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे त्याचा रस किंवा दूधासोबत शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच मुलांच्या हाडांची वाढ सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा.
4 / 8
2) रक्त शुद्ध होतं - शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्ये देखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अ‍ॅन्टीबायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अ‍ॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.
5 / 8
3) शुगर कंट्रोल - शेवग्याच्या शेंगांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारते.
6 / 8
4) श्वासासंबंधी समस्या दूर होतात - घशातील खवखव, कफ, श्वास घेताना त्रास होणे असा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावे.यामधील दाहशामक घटक श्वसनमार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यास मदत करतात. क्षयरोग, ब्रोन्कायटीस, अस्थमा यासारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात.
7 / 8
5) इन्फेक्शनपासून बचाव- शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.
8 / 8
6) लैंगिक आरोग्य सुधारतं - शेवग्याच्या शेंगांमधील झिंक घटक स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरतं. यामुळे उत्तम दर्जाचे वीर्य निर्माण होते तसेच शीघ्रपतनाची समस्या कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य