Eat these foods to prevent the growth of cancer cells in the body
हे पदार्थ खाऊन आरोग्य जपा; टळेल कॅन्सरचा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 3:01 PM1 / 7हळद- फुफ्फुस आणि स्तनांच्या कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्याचं काम हळद करते. कॅन्सर आणि साध्या पेशी ओळखून त्यातील कॅन्सरच्या पेशी संपवण्याचं काम हळद करते, असं टेक्सास विद्यापीठाच्या एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरच्या संशोधनातून समोर आलं आहे. 2 / 7ऑलिव्ह ऑईल- यामुळे शरीरातील प्रोटिन्सचं प्रमाण वाढतं. ऑलिव्ह ऑईलचा समावेश दैनंदिन आहारात केल्यास कॅन्सर, हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका कमी होतो. 3 / 7बीन्स, सायट्रस फ्रुट्स- बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यामुळे कोलोन कॅन्सरचा धोका टळतो. तर लिंबू, द्राक्ष, संत्र यासारखी सायट्रस फ्रुट्स खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका टळतो. आठवड्यातून तीनदा ही फळं खाल्ल्यास पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता 25 टक्क्यांनी कमी होते. 4 / 7नट्स- नियमित नट्स खाल्ल्यानं विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. नट्समध्ये सेलेनियम असल्यानं त्यामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सर होण्याची शक्यता घटते. नियमित नट्स खाल्ल्यास स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यता 80 टक्क्यांनी कमी होते.5 / 7जव- कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचं काम जव करतं. यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं कॅन्सर होण्याची शक्यता होती. 6 / 7दालचिनी- शरीरातील ट्युमरची वाढ रोखणारे घटक दालचिनीमध्ये आहेत. त्यामुळे दालचिनीच्या सेवनानं कॅन्सरची शक्यता कमी होते. 7 / 7बेरीज- नियमित बेरी खाल्ल्यास कॅन्सर पेशींची वाढ रोखली जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications