Eat these seven food items to fight extra cholesterol in the body
एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉलमुळे होऊ शकतात गंभीर समस्या; 'हे' पदार्थ ठरतील गुणकारी By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 3:52 PM1 / 10आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. हे शरीरातील पेशींचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त कोलेस्ट्रॉल फॅट्सचे रक्तात विघटन होण्यापासून रोखण्याचं काम करतं. शरीरामध्ये हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (चांगलं कोलेस्ट्रॉल) आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (खराब कोलेस्ट्रॉल) असं दोन कोलेस्ट्रॉलचे प्रकार आढळून येतात. चांगलं कोलेस्ट्रॉल हलकं असल्यामुळे ब्लड वेसेल्समध्ये जमा झालेलं फॅट आपल्यासोबत घेऊन जातं. तेच खराब कोलेस्ट्रॉल जास्त चिपचिपीत आणि घट्ट असतं. (Image Credit : EatRight Ontario)2 / 10आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीचा थेट संबंध आपल्या हृदयाशी असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलशी निगडीत कोणतीही समस्या उद्भवल्यास हृदयाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं ठरतं. जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं असतं. तसेच तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यानेही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 3 / 10जेव्हा खराब कोलेस्ट्रॉलची पातळी शरीरात वाढते, तेव्हा ते ब्लड वेसेल्स आणि धमन्यांमध्ये साचतं. यामुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. असं झाल्यामुळे हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल कमी करणं अत्यंत आवश्यक असतं. आम्ही आज तुम्हाला काही पदार्थांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता. 4 / 10ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्याने लो डेंसिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स असतात. ऑलिव्ह ऑइल सलाड, भाज्या आणि फळांसोबत खाणं फायदेशीर ठरतं. 5 / 10 चहामध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉस कंट्रोलमध्ये ठेवणारी तत्व असतात. तीन आठवड्यांपर्यंत सतत ब्लॅक टी प्यायल्याने रक्ततील लिपिड 10 टक्क्यांनी कमी होतं. (Image Credit : The Tea Trove)6 / 10पालक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्याचबरोबर पालक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही मदत करते. पालक खाल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. पालक तुम्ही जेवणामध्ये किंवा सलाडमध्ये वापरू शकता. 7 / 10सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. ओट्समध्ये असलेलं बीटा-ग्लूकन लो डेन्सिटी लिपोप्रोटीन शोषून घेण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त अक्रोड आणि बदाम खाल्यानेही कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. 8 / 10कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण अत्यंत फायदेशीर ठरतो. लसूण खाल्याने रक्त शुद्ध होण्यासोबतच ब्लड प्रेशर कमी होण्यासही मदत होते. 9 / 10बदाम, अक्रोड आणि पिस्त्यामध्ये फायबर आढळून येतं. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढविण्यासाठी मदत करतं. जेवण केल्यानंतर अक्रोड खाल्याने हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. 10 / 10टिप : वरील गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications