शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दररोज पिस्ता खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?; जाणून घ्या, किती असावं प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 4:43 PM

1 / 10
पिस्ता खाणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हेल्दी फॅट्स, प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स व्यतिरिक्त, त्यात व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियमसह इतर अनेक महत्त्वपूर्ण पोषक घटक आढळतात.
2 / 10
या ड्रायफ्रूटमध्ये इतर नट्सच्या तुलनेत कमी कॅलरीज आणि जास्त प्रोटीन असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या आरोग्याची देखील काळजी घेतं. पिस्ता खाण्याचे कोणते फायदे आहेत आणि एका दिवसात किती प्रमाणात खावं ते जाणून घेऊया...
3 / 10
हृदयाचे आरोग्य सुधारतं - पिस्त्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं, जे हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं.
4 / 10
वजन कमी होतं - पिस्त्यात फायबर आणि प्रोटीन असतात, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
5 / 10
मानसिक आरोग्य सुधारतं - पिस्त्यात असलेले व्हिटॅमिन बी6 आणि मॅग्नेशियम मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
6 / 10
मधुमेहासाठी फायदेशीर - पिस्त्यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतं, जे रक्तातील साखरेची लेव्हल कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतं.
7 / 10
पचनक्रिया सुधारते - पिस्त्यात फायबर असतं, जे तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
8 / 10
दृष्टी सुधारते - पिस्त्यामध्ये भरपूर प्रमाणात ल्यूटीन आणि झेक्सॅन्थिन असतात, जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात.
9 / 10
पिस्ता नियमित खाल्ल्याने आरोग्य सुधारतं. परंतु लोकांनी मीठ नसलेला पिस्ता खावा आणि दिवसातून मूठभर पिस्ता खाणं फायदेशीर ठरू शकतं. यापेक्षा जास्त सेवन करू नये.
10 / 10
पिस्ता जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याविषयक अनेक समस्या उद्भवू शकतात. विशेषत: तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास पिस्ता खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स