eating pizza and burger can cause bowel cancer new study revealed
पिझ्झा आणि बर्गर खाता? मग हे वाचाच...कॅन्सरचा धोका; वैज्ञानिकांनी दिला इशारा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 9:50 AM1 / 8तुम्ही जर फास्ट फूडचे शौकीन असाल तर सावधान कारण तुम्ही जर बऱ्याच काळापासून पिझ्झा, बर्गर, बिस्किट्स, कोल्ड ड्रिंक्स आणि इतर अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खात असाल तर तुम्हाला आतड्यांच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. हा रोग कौटुंबिक हिस्ट्री, वाढतं वाय आणि खराब जीवनशैलीशी निगडीत आहे. 2 / 8नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये आढळून आलं की एखाद्या व्यक्तीची लाइफस्टाइल बऱ्याच काळापासून खराब आहे तर असा व्यक्ती नक्कीच या जीवघेण्या रोगाला बळी पडू शकतो. 3 / 8रिसर्चमध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं सेवन करणाऱ्या २९ टक्के पुरूषांमध्ये कॅन्सरचा धोका संभवण्याची शक्यता अधिक असल्याचं आढळून आलं आहे. वैज्ञानिकांना हेही आढळून आलं की ज्या महिला रेडी टू इट फूडचं मोठ्या प्रमाणात सेवन करतात अशांना आतड्यांचा कॅन्सरचा धोका १७ टक्के वाढतो. 4 / 8अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्य पदार्थांमध्ये असे तत्व आढळून येतात की जे सामान्यस्वरुपात घरगुती जेवण बनवताना त्यांचा वापर केला जात नाही. जसं की केमिकल आणि स्वीटनर जे शरीरासाठी धोकादायक आहेत. अल्ट्रा प्रोसेस्ड आणि प्रोसेस्ड फूड यात फरक आहे. प्रोसेस्ड फूडमध्ये जेवण गरम करणं, फ्रीज करणं, डायसिंग, ज्युसिंग यांचा समावेश आहे. प्रोसेस्ड फूड अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या तुलनेत तितकंसं हानीकारक नाही. 5 / 8इन्स्टंट न्यूडल्स आणि सूप, रेडी टू इट मिल्स, पॅक्ड स्नॅक्स, फिजी कोल्ड ड्रिंक्स, केके, बिस्किट, मिठाई, पिझ्झा, पास्ता आणि बर्गर6 / 8अल्ट्रा प्रोसेस्ड फूड स्वस्त आणि सहज उपलब्ध होतात पण यात मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. यामुळे भूकेपेक्षा अधिक ते खाल्ले जातात आणि वजनही वाढू लागतं. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड वेस्टर्न लाइफस्टाइलची सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. जवळपास २३ हजार लोकांवर झालेल्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांना अनहेल्दी डाएट आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचं सेवन करणाऱ्यांमध्ये डेथ रेट अधिक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच वैज्ञानिकांनी अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडपासून थोडं दूर राहण्याचा सल्ला दिला आहे7 / 8ब्राझीलमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार एक सर्वसामान्य धारणा आहे की अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड सामान्य गोष्ट आहे आणि आपली इच्छा असूनही आपण त्यापासून दूर जाऊ शकत नाही. कोणत्याही डाएटमध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडची आवश्यकता नसते. लोक फक्त सुविधा आणि चवीसाठी आपल्या डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करतात. 8 / 8ब्राझीलमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार एक सर्वसामान्य धारणा आहे की अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड सामान्य गोष्ट आहे आणि आपली इच्छा असूनही आपण त्यापासून दूर जाऊ शकत नाही. कोणत्याही डाएटमध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडची आवश्यकता नसते. लोक फक्त सुविधा आणि चवीसाठी आपल्या डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications