Mounjaro: वजन कमी करणारे प्रभावी औषध भारतात लाँच झाले; जाणून घ्या किंमत आणि साईड इफेक्ट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 17:30 IST
1 / 12स्थुलपणा कमी करण्यासाठी दररोज आपल्याला एक ना अनेक नुस्खे दिसत असतात. कोणी व्यायाम करायला सांगतो, कोणी कसलातरी काढा करायला सांगतो. कोणी ते महागडे हर्बल लाईफचे प्रॉडक्ट पण खपवतो. आता तर अमेरिकेत यशस्वी ठरलेले वजन कमी करणारे औषध भारतात लाँच झाले आहे. 2 / 12लठ्ठपणा कमी करणारे आणि मधुमेहविरोधी औषध मोंजारो भारतात उपलब्ध होणार आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया म्हणजेच CDSCO कडून मान्यता मिळाली आहे. हे अमेरिकन कंपनीचे औषध असून एली लिली अँड कंपनीने ते बनविले आहे. अमेरिकेत या औषधाचे नाव वेगळे आहे, जे भारतात नव्या नावाने विकले जाणार आहे. 3 / 12मोंजारो हे वजन कमी करण्याच्या फायद्यांसाठी ओळखले जात आहे. औषध घेऊन वजन कमी करणे किती योग्य आहे, असे जरी मोठमोठे डॉक्टर म्हणत असले तरी डायबेटीक रुग्णांसाठे हे औषध वरदान ठरणार आहे. वेट लॉसच्या औषधांबाबत अनेक डॉक्टरनी साईड इफेक्टची चिंता व्यक्त केली आहे. 4 / 12भारतातील सुमारे २३% पुरुष आणि २४% महिलांचे वजन जास्त आहे. याचा अर्थ असा की भारत लठ्ठपणाच्या संकटाचा सामना करत आहे. या लठ्ठपणामुळे अनेक घातक आजार देखील होऊ शकतात.5 / 12मोन्जारो हे औषध टाइप-२ मधुमेह आणि लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. जेव्हा अन्न खातो तेव्हा रीरात GLP-1 म्हणजेच ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1 आणि GIP म्हणजेच ग्लुकोज-आश्रित इन्सुलिनट्रॉपिक पॉलीपेप्टाइड नावाचे दोन हार्मोन्स सक्रिय होतात. मोंजारो हे या दोन्ही हार्मोन्सची कृत्रिम प्रत आहे.6 / 12इन्सुलिनचे उत्पादन वाढवून रक्तातील साखर नियंत्रित करते आणि भूक कमी करते, ज्यामुळे कमी अन्न खाण्याची इच्छा निर्माण होते. म्हणूनच वजन कमी करण्याच्या औषध म्हणूनही याचा वापर केला जात आहे.7 / 12२,५३९ जास्त वजन असलेल्या लोकांवर याचा प्रयोग करण्यात आला. १५ मिलीग्रामच्या उच्च डोसमध्ये घेतलेल्यांचे सरासरी २१.८ किलो वजन कमी झाले. तर ५ मिलीग्रामचा सर्वात कमी डोस घेतला त्यांचे सरासरी १५.४ किलो वजन कमी झाले.8 / 12४० आठवड्यांपेक्षा जास्त काळ केलेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे दिसून आले की ते रक्तातील साखरेची (A1C) पातळी २.४% ने कमी करण्यास प्रभावी होते. 9 / 12मोंजारोचा सुरुवातीचा डोस २.५ मिलीग्राम आहे आणि २.५ मिलीग्रामच्या एका डोसच्या कुपीची किंमत ३,५०० रुपये आहे. 10 / 12आठवड्यातून एक डोस घ्यायचा असतो. म्हणजेच महिन्यातून ४ डोस घ्यायचे आहेत. म्हणजेच २.५ मिलीग्राम डोससाठीचा महिन्याचा खर्च हा १४००० रुपये होणार आहे. ५ मिलीग्राम इंजेक्शनची किंमत ४,३७५ रुपये आहे. 11 / 12क्लिनिकल चाचण्यांमध्ये ते अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. इंजेक्शन दिल्यानंतर वजन कमी होण्यासाठी काही आठवडे किंवा काही महिने लागू शकतात.12 / 12काही लोकांमध्ये मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, अतिसार, थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते.