Exactly how long can a cloth mask be used here you all you need to know
कापडी मास्क नेमका किती काळ वापरू शकतो? एकदा ही माहिती नक्की वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 10:46 AM1 / 8कापडी मास्कवर सुरुवातीच्या काळात खूप टीका झाली. पण असे असले तरी हे कापडी मास्कही कोरोनाचा संसर्ग रोखण्यास सक्षम असल्याचे आता स्पष्ट होत आहे. 2 / 8कोलोरॅडो विद्यापीठाच्या चमूने कोणता मास्क सर्वाधिक सुरक्षित ठरतो, याचेही संशोधन केले. कापडी मास्कमुळे २३ टक्के हवा फिल्टर होऊन शरीरात जाऊ शकते. या दराने कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो, असेही यावेळी निदर्शनास आले. 3 / 8सर्जिकल मास्कमुळे कोरोना विषाणूपासून बचाव होण्याचे प्रमाण ४२ ते ८८ टक्के एवढे आहे. 4 / 8एन-९५ मास्क सर्वात सुरक्षित असून कोरोना विषाणूपासून ९५ ते ९९ टक्के बचाव करतात. 5 / 8कापडी मास्क लावणे अगदीच वाईट दिसत असले तरी ते धुवून स्वच्छ करुन वापरता येणे शक्य असते. 6 / 8कापडी मास्क धुवून स्वच्छ केले तरी कोरोना विषाणूला शरीरात शिरण्यापासून रोखण्याची त्यांची क्षमता कमी होत नाही. 7 / 8त्यामुळे हे मास्क पुन्हा वापरण्यायोग्य असून ते फेकू नका, असे संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. 8 / 8कोलोरॅडो विद्यापीठाने केलेले हे संशोधन एअरोसोल अँड एअर क्वालिटी रिसर्च या मासिकात प्रकाशित झाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications