शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 7:08 PM

1 / 6
बराच वेळ बसून राहिल्याने कंबर पाठ आखडणे ही सध्याच्या जीवनशैलीमध्ये सामान्य बाब बनली आहे. त्यामुळे अनेकदा हालचाली करण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत दिलासा मिळवण्यासाठी खालील ५ व्यायाम प्रकारांमधून तुम्ही दिलासा मिळवू शकता. तसेच दुखण्यापासून आराम मिळवण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे.
2 / 6
सेटिंग स्ट्रेच हा एक सरळ सोपा व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम करण्यासाठी तुम्ही सपाट पृष्टभागावर बसा आणि पाय समोरच्या दिशेला पसरवा. त्यानंतर हळुहळू आपल्या हातांना पायांच्या दिशेने न्या. तसेच जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत मोठा श्वास घ्या. हा व्यायाम पाठीच्या कण्याला खेचतो. त्यामुळे मासपेशींना आराम मिळतो.
3 / 6
दुसरा व्यायाम पाठीच्या कण्याची लवचिकता वाढवतो. हा व्यायाम करण्यासाठी हात समोर टेकवून उभे राहा. आपली पाठ खालच्या दिशेने वाकवा आणि डोकं वर करा. त्यानंतर पाठ वरच्या दिशेने न्या. ही प्रक्रिया १० ते १५ वेळा करा.
4 / 6
हा व्यायाम प्रकार हिप्स आणि पाठीच्या स्नायूंना मजबूत करण्यास मदत करतो. त्यासाठी एका बाजूला झोपा आणि गुडघे दुमडा. आता आपल्या गुडघ्यांना एकत्र ठेवा आणि हळूहळू गुडघे वर उचला. या स्थितीत पाच सेकंदांपर्यंत राहा. त्यानंतर गुडघे हळूहळू खाली आणा. ही क्रिया १० ते १५ वेळा करा.
5 / 6
हा व्यायाम करण्यासाठी सरळ बसा आणि पाय समोर पसरवा. त्यानंतर पाय गुडघ्यांवर ठेवा. हळूहळू पाठ मागच्या बाजूने झुकवा. तसेच कणा खालच्या दिशेने हलवा. काही सेकंदांसाठी या स्थितीत राहा. हळुहळू वर या. हा व्यायाम कण्याला स्ट्रेच करतो आणि स्नायूंना मजबूत करतो.
6 / 6
हा व्यायाम पाठीचा खालील भाग मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यासाठी पाठीच्या दिशेने झोपा आणि गुडघे दुमडा. आता आपल्या टाचा जमिनीवर ठेवून हळुहळू कंबर वर उचला. या स्थितीत काही सेकंद राहा. त्यानंतर हळुहळू खाली या. ही क्रिया १० ते १५ वेळा करा.
टॅग्स :Healthआरोग्य