experts explain 5 unusual symptoms of diabetes and high blood sugar level
सावधान! 'ही' 5 लक्षणं असू शकतात Diabetes ची सुरुवात; दुर्लक्ष करणं पडेल चांगलंच महागात By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 3:51 PM1 / 16डायबिटीज (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. दुर्दैवाने हा आजार आता भारतात सर्वात वेगाने पसरत आहे आणि या कारणास्तव भारताला 'मधुमेहाची राजधानी' म्हटले जाते. 2 / 16एका रिपोर्टनुसार, जगभरात टाइप-2 मधुमेहाचे 50 मिलीयनपेक्षा अधिक रुग्ण आहेत, ज्यामध्ये भारतात सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या अंदाजानुसार मधुमेहामुळे किंवा रक्तातील साखर वाढल्याने जगभरात 3.4 दशलक्ष मृत्यू होतात. 3 / 16हा एक कोणताही उपचार नसलेला आजार असल्याने त्यावर नियंत्रण मिळवूनच निरोगी जीवन जगता येते. तज्ज्ञांचे मत आहे की, सुरुवातीच्या अवस्थेत औषधांद्वारे तो आटोक्यात आणला जाऊ शकतो.4 / 16मधुमेहाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकत नाही पण नियंत्रणात येऊ शकतो असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मेडिकल एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की लक्षणे वेळेवर ओळखल्यास आणि नियमित तपासणी केल्यास डायबिटीज टाळता येऊ शकतो.5 / 16लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे अनेकदा गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे काही लक्षणं जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून लवकर बरे होऊ शकतो. याबाबत अधिक जाणून घेऊया...6 / 16तुम्ही जर रात्री चांगली, शांत झोप घेत असाल पण तरीही तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुम्ही रक्तातील साखरेची तपासणी करून घ्यावी. 7 / 16एक्सपर्ट्स मानतात की थकवा जाणवणे हे निश्चितपणे मधुमेहाचेच एक लक्षण आहे. थकवा हे इतर अनेक रोगांचे लक्षण किंवा संकेत असू शकते. म्हणूनच कोणत्याही समस्यांबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलणे महत्त्वाचे आहे.8 / 16जर तुम्हाला पोटभर नाश्ता करूनही भूक लागत असेल तर हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण असू शकते ज्यासाठी ताबडतोब तपासणी करणं गरजेचं आहे. मधुमेहामध्ये तुम्हाला जेवल्यानंतरही खूप भूक लागते. 9 / 16डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तुमच्या स्नायूंना अन्नातून आवश्यक ऊर्जा मिळत नाही. तुमच्या शरीराची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता ग्लुकोजला स्नायूंमध्ये प्रवेश करण्यापासून आणि ऊर्जा प्रदान करण्यापासून प्रतिबंधित करते.10 / 16हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे हे टाइप 2 मधुमेहाचे लक्षण असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि त्यामुळे असे होऊ शकते. 11 / 16जेव्हा मज्जातंतू खराब होतात तेव्हा तुम्हाला मुंग्या येणे, पिन टोचल्यासारखं वाटणे, जळजळ किंवा तीक्ष्ण वेदना जाणवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांना कधीही मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते.12 / 16जर तुम्ही वेटलॉस करत नसाल आणि हेल्दी आहार घेत असाल तरीही दिवसेंदिवस वजन कमी होत असेल तर तुम्ही सतर्क राहायला हवे. तज्ज्ञांच्या मते हे ब्लड शुगरचे लक्षण असू शकते. हे काही आठवडे ते काही महिन्यांपर्यंत राहू शकते. 13 / 16जेव्हा ग्लुकोज तुमच्या पेशींपर्यंत पोहोचत नाही तेव्हा तुमचे शरीर समजू लागते की तुम्ही भुकेने मरत आहात आणि ती भरपाई करण्याचा मार्ग ते शोधू लागते. अशावेळी ते फॅट आणि स्नायू वेगाने बर्न करून ऊर्जा निर्माण करते.14 / 16पुरेसे पाणी प्यायल्यानंतर दिवसातून पाच ते सहा वेळा लघवी होणे हे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल किंवा झोपत असतानाही लघवीला होत असेल तर हे मधुमेहाचे स्पष्ट लक्षण असू शकते. 15 / 16जर तुमची लघवी फेसाळ दिसत असेल तर ते तुमच्या लघवीमध्ये प्रथिने असल्याचे लक्षण असू शकते. हे सहसा तुमच्या किडनीत काहीतरी समस्या असल्याचं दर्शवते. ज्यामध्ये रक्तातील हाय ब्लड शुगरशी सामना करण्याचा प्रयत्न समाविष्ट असू शकतो, जसे की मधुमेहामध्ये होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 16 / 16(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.) आणखी वाचा Subscribe to Notifications