Eye care strain pain treatment home remedies tips for eye care api
तासंतास टीव्ही, लॅपटॉपसमोर बसत असाल तर 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी, नाही तर टीव्ही बघणं पडेल महागात.... By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 9:25 AM1 / 10Eye Care: Coronavirus मुळे लोकांना आपल्या घरातच रहावं लागत आहे. Lockdown किंवा Qurantine मुळे वर्क फ्रॉमच्या निमित्ताने असेल किंवा वेळ टाइम-पासच्या निमित्ताने Binge Watch करत तुमचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपसमोर जात जात असेल याचा तुमच्या डोळ्यांवर फार वाईट परिणाम होतो. 2 / 10स्क्रीन किंवा टीव्हीसमोर तासंतास बसून राहत असाल आणि यामुळे डोकेदुखी होऊ लागते. स्मार्टफोनचा जास्त वापर केल्याने, Binge-Watch केल्याने किंवा कोणत्याही कारणाने स्क्रीनसमोर तासंतास बसत असाल डोळ्यातून पाणीही येऊ लागतं, डोळ्यांची वेदना होऊ लागते. अशात आम्ही तुम्हाला डोळ्यांची काळजी घेण्याच्या काही टीप्स सांगणार आहोत.3 / 10ड्राय डोळ्यांची अशी घ्या काळजी - स्क्रीनसमोर सतत बसून राहिल्याने अनेकांच डोळे ड्राय होतात. अशी समस्या होत असेल तर थोड्या थोड्या वेळाने थंड पाण्याने डोळे धुवावे. काही लोकांना स्वच्छ कापडावर फूंकर मारून डोळा शेकल्यासही आराम मिळतो. डोळ्याचं ड्रायनेस दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने आय ड्रॉपचा देखील वापर करू शकता.4 / 10डोळ्यांची वेदना - जर तुम्ही जास्त वेळ टीव्ही बघत असाल तर याची काळजी घ्या की, तुम्ही 8 तास झोप घेत असाल. 8 तास झोप घेतल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. टीव्ही फ्लॅट स्क्रीन असेल तर उत्तम. 5 / 10तसेच लाईट बंद करून टीव्ही, लॅपटॉप वापरणं टाळा. असं करून डोळ्यांवर अधिक तणाव पडतो. डोळ्यांची वेदना होत असेल तर काही सेकंद पापण्यांची उघडझाप करा. याने तुम्हाला आराम मिळेल.6 / 10डोळ्यातून पाणी येत असेल तर काय? - डोळ्यातून पाणी येत असेल तर कोल्ड-कंप्रेस कामात येतं. एका कापडात काही बर्फाचे तुकडे घ्या. ते डोळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला फिरवा. याने डोळ्यांची वेदना कमी होईल. तसेच डोळ्यांना सतत हात लावू नका.7 / 10काही मिनिटांचा ब्रेक घ्या - काम करताना किंवा टीव्ही बघताना काही वेळासाठी ब्रेक घ्या. तुमच्या शरीरासोबतच डोळ्यांनाही आरामाची गरज असते. 8 / 10ब्रेकचा अर्थ डोळे बंद ठेवा आणि त्यांना आराम द्या. ब्रेकचा असा नाही की, टीव्ही बंद करून मोबाईलमध्ये डोकं घाला. ब्रेकमध्ये कोणत्याही स्क्रीनपासून दूर रहा.9 / 1020-20-20 चा फंडा - जर तुम्हा बऱ्याच वेळापासून स्क्रीनवर काम करत असाल तर 20-20-20 पद्धत वापरून बघा. याचा अर्थ हा होतो की, दर 20 मिनिटाने 20 फूट दूर अंतरावर असलेली एखादी वस्तू 20 सेकंद बघा. याने याने डोळ्यांना आराम मिळेल. (Image Credit : freepik.com)10 / 10या सर्व गोष्टी केल्याने डोळ्यांवर पडणारा तणाव, वेदना कमी होतात. त्यासोबतच डॉक्टरांकडून डोळ्यांच्या काही एक्सरसाइज जाणून घ्या. त्यानेही तुम्हाला डोळ्यांना आराम देता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications