शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विश्वास ठेवणं अवघड; पण हे चरबीयुक्त पदार्थ घटवतील तुमचं वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 5:37 PM

1 / 6
चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढतं असा अनेकांचा समज असतो. मात्र काही चरबीचं प्रमाण जास्त असलेले काही पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात.
2 / 6
तूप- दररोज एक चमचा तूप खाल्ल्यास शरीराला फायदा होतो. तुपामुळे अतिरिक्त फॅट्स बर्न होतात. याशिवाय अन्नपचनाची प्रक्रिया सुरळीत होते.
3 / 6
ऑलिव्ह ऑईल- एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये १४ ग्रॅम फॅट असतं. त्यामुळे दररोजच्या जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर फायदेशीर ठरतो.
4 / 6
दही- दह्यामध्ये शरीराला फायदेशीर ठरणारे फॅट्स असतात. पचनक्रिया सुधारण्यास, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास दही मदत करतं.
5 / 6
अंड- अंड्यामुळे पोट लगेच भरतं. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहतं.
6 / 6
अक्रोड- दररोज मूठभर अक्रोड खाल्ल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. याशिवाय हाडांचं आरोग्यदेखील सुधारतं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स