शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चक्कर येणं सामान्य वाटतंय? आजच तपासून घ्या, असू शकतो तुम्हाला यापैकी कोणताही गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 5:14 PM

1 / 10
काही जणांना झोपेतून उठून बसताना,बसलेले असल्यास उठून उभे राहताना रक्तदाब अचानक कमी होण्याची समस्या जाणवते.शरीर नवीन स्थितीत येताना काही क्षणांसाठी ही भोवळ येण्याची समस्या जाणवते.या समस्येला ऑर्थोस्टेटीक अथवा पोश्चरल हायपोटेंशन असे म्हणतात.उतार वयात मधूमेहासारख्या काही आरोग्य समस्या असल्यास हे लक्षण अधिक जाणवते.
2 / 10
मूत्रप्रवाह वाढवण्यासाठी घेण्यात येणा-या,नशेचा अर्क असलेल्या,उच्च रक्तदाबावरील गोळ्या व इतर काही औषधांमुळे भोवळ येण्याची समस्या निर्माण होते.यासाठी अशी औषधे घेण्यापुर्वी त्यांच्या पॅकींग वर चक्कर येणे हा साईड इफेक्ट आहे का हे जरुर तपासा.
3 / 10
काही ह्रदय विकारांमुळे जसे की एरेथमिया या विकारामुळे देखील भोवळ येते. एरेथमियामध्ये ह्रदयाच्या ठोक्यांचा लय बदलतो.कधीकधी हा दर अती जास्त म्हणजे एका मिनीटाला १८० तर कधीकधी अती कमी म्हणजे एका मिनीटाला अगदी ३० असा होतो.याचा परिणाम मेंदूला होणा-या रक्तपुरवठ्यावर होतो व तुम्हाला भोवळ आल्यासारखी वाटते.कधी कधी ह्रदयाची ही गती अचानक थांबल्यामुळे देखील ही समस्या होते.अशावेळी गती थांबण्याचा कालावधी पाच सेंकदापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला भोवळ आल्याचा अनुभव येतो.
4 / 10
तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे देखील तुम्हाला भोवळ आल्यासारखे वाटते.जेव्हा तुमच्या रक्तातील ग्लूकोजची पातळी ७० mg/dL इतकी किंवा त्यापेक्षा अधिक खाली जाते तेव्हा ही अवस्था निर्माण होते.थकवा,थरथर,घाम येणे व भोवळ ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
5 / 10
ह्रदयाचे स्नायू,ह्रदयाच्या झ़डपा अथवा रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास भोवळ येते.ह्रदयविकाराचा झटका हे देखील भोवळ येण्याचे कारण असू शकते.
6 / 10
शरीराला पुरेसे पाणी नाही मिळाले तर डिहायड्रेशन मुळे लो ब्लड प्रेशर,अशक्तपणा,चक्कर येणे ,थकवा,मळमळ ही लक्षणे दिसू लागतात.
7 / 10
अॅनिमियाचे प्रमुख लक्षण हे थकवा हे असते.जर तुम्ही अॅनिमिक असाल तर रक्तातील लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे तुमच्या मेंदूला ऑक्सिजन चा पुरेसा पुरवठा होत नाही.त्यामुळे तुम्हाला चक्कर येण्याचा त्रास होतो.विटामिन बी १२ च्या अभावामुळे देखील हा अशक्तपणा येतो.
8 / 10
ऑटोमेटीक न्यूरोपॅथी हा एक मज्जातंतूचा विकार आहे.यामुळे मेंदूला मज्जासंस्थेच्या कार्यात बिघाड झाल्याचा संदेश मिळतो.याचा परिणाम ह्रदयाचे ठोके,रक्तदाब,घाम उत्सर्जीत होणे,पचनक्रिया या क्रियांवर होतो.या समस्येमुळे इतर अनेक विकार देखील होतात.त्यावर केल्या जाणा-या उपचारांचे शरीराला दुष्परिणाम भोगावे लागतात.रक्तदाब कमी झाल्यामुळे या स्थितीचे चक्कर अथवा भोवळ येणे हे एक प्रमुख लक्षण आहे.या पासून बचावण्यासाठी मधूमेह टाईप २ रुग्णांनी वर्षातून एकदा स्वत:ची संपुर्ण आरोग्य तपासणी करुन घ्यावी.
9 / 10
शरीर कमजोर होणे हे मानसिक कारण सुद्धा असू शकते.चिंतेमुळे होणा-या विकारांमध्ये पॅनिक अटॅक येण्यापुर्वी भोवळ येण्याचे लक्षण दिसू शकते.
10 / 10
जेव्हा तुम्ही ताण-तणावात असता तेव्हा तुमचा श्वास जलद व दीर्घ होतो.त्यामुळे श्वास जाणिवपूर्वक घेतला जात नाही.ताण-तणाव,चिंता असल्यास डोके गरगरणे,बधीर होणे,ह्रदयाचे ठोके वाढणे,अंधूक दृष्टी,घाम येणे,भोवळ आल्यासारखी वाटणे,हात व तोंडाला मुंग्या येणे ही लक्षणे जाणवतात.कधीकधी अशी व्यक्ती चक्कर आल्यामुळे पडू देखील शकते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोगdiabetesमधुमेह