1 / 11देशात कोरोनाची दुसरी लाट ज्याप्रकारे वेगाने पसरतेय. दिवसाला ३ लाखाहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. अशावेळी कोरोना चाचणी वाढवण्याची गरज स्पष्टपणे दिसून येत आहे. दिल्ली हायकोर्टाने ICMR ला याबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत. 2 / 11हायकोर्टाने म्हटलं की, ICMR ने परवानगी असलेल्या सर्व चाचण्या सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध हव्यात. विशेषत: त्या टेस्ट ज्या स्वस्त आणि लवकर निष्कर्ष काढतील. आता RTPCR कोविड १९ च्या चाचणीसाठी गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. परंतु फेलुदा(FELUDA) आणि RAY चाचणी त्याच्या तुलनेत स्वस्त आणि लवकरच निष्कर्ष देते. 3 / 11फेलुदा चाचणीविषयी जाणून घेऊया. FELUDA म्हणजे FNCAS9 Editor Linked Uniform Detection Assay याचा पूर्ण अर्थ आहे. यात CRISPR जीन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. काऊंसिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सेंटर आणि टाटा ग्रुपच्या युवा वैज्ञानिकांनी ही चाचणी विकसित केली आहे. 4 / 11CSIR नुसार ही जवळपास RTPCR चाचणीप्रमाणेच मानली जाते. याचा अधिक गुण म्हणजे केवळ ४५ मिनिटात याचे निष्कर्ष काढले जातात. तर RT PCR चाचणीत रिपोर्ट येण्यासाठी तासापेक्षा जास्त वेळ लागतो. ही एक पेपर स्ट्रीपच्या माध्यमातून केली जाणारी प्रेग्नेंसी टेस्टसारखी आहे. 5 / 11ही एक पेपर स्ट्रिप आहे जी नमुन्यात व्हायरस असेल तर त्याचे रंग बदलते. या किटमध्ये दोन लाईन असतात. एक कंट्रोल आणि दुसरा निकाल देण्यासाठी. RTPCR च्या तुलनेत या कोणत्याही अन्य उपकरणाची गरज भासत नाही. 6 / 11CRISPR म्हणजे Clustered Regulary Interspaced Short Palindromic Repeats एक जीन एडिटिंग तंत्रज्ञान आहे. याचा वापर जेनेटिकमधील आजारांवरील उपचार आणि त्याला रोखण्यासाठी फायदेशीर होतो. CRISPR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोणत्याही जीवाच्या आतमध्ये DNA चे खास सीक्वेंज ओळखू शकतो. 7 / 11CRISPR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रिसर्चर्स सोप्या पद्धतीने DNA सीक्वेंसेजमधील फेरबदल ओळखू शकतात. या तंत्रज्ञानाला भविष्यातील इतर पैथोजंस शोधण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. कोविड १९ च्या शोधासाठी CRISPR चाचणीला सर्वात पहिलं अमेरिकेने परवानगी दिली आहे. 8 / 11फेलुदा टेस्ट काय असते? नाकातून स्वब घेतात, RNA काढला जातो. सिंगल स्टेप RT PCR करतात. डिप स्टीकला फेलुदा मिस्कमध्ये बुडवतात. स्ट्रिपवर असणारं गोल्ड नैनोपार्टिकल फेलुदा कॉम्पलेक्सला चिटकलं जातं. बाकी गोल्ड पार्टिकल्स कंट्रोल लाईनवर पकडले जातात. 9 / 11त्यानंतर टेस्ट लाईन अथवा कंट्रोल लाईनच्या रंगात बदल होतो. एका लाईनचा अर्थ निगेटिव्ह आणि दोन लाईनचा अर्थ पॉझिटिव्ह असतो. या संपूर्ण चाचणीला १ त २ मिनिटं लागतात. RTPCR चे उपकरण महाग असतात. त्यामुळे फेलुदा चाचणी स्वस्त पडते. 10 / 11CSIR IGIB चे ज्येष्ठ संशोधक म्हणतात की, फेलुदा टेस्टसाठी तांत्रिक दक्षता घेण्याची गरज नाही. हे वेळ आणि पैसा वाचवतं. फेलुदा चाचणीची किंमत ५०० रुपये आहे तर RTPCR चाचणीची किंमत प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहे. यावर दिल्ली हायकोर्टात ICMR सांगितले फेलुदा टेस्ट जास्त प्रसिद्ध नाही कारण त्याची किट महाग आहे. 11 / 11ICMR ने सांगितल्यानुसार फेलुदा टेस्ट ३०० रुपये आणि RTPCR चाचणी १०० रुपयात केली जाऊ शकते. परंतु फेलुदा टेस्ट सहजपणे कुठेही घेऊन जाऊ शकतो. तर RTPCR चाचणीसाठी लॅबची आवश्यकता भासते.