first zika virus case detected in pune maharashtra know symptoms and precautionary measures
राज्यात झिकाचा पहिला रुग्ण सापडला; कसा कराल बचाव, काय आहेत लक्षणं; जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 2:29 PM1 / 10केरळमध्ये वेगानं पसरलेल्या झिका विषाणूनं आता महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुण्यात काल झिकाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. 2 / 10पुण्यातल्या पुरंदरमध्ये एका ५० वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली. तिची चिकनगुनिया चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली आहे. 3 / 10आतापर्यंत देशात केवळ केरळमध्येच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली होती. केरळमध्ये आतापर्यंत ६३ झिकाबाधित आढळून आले आहेत. आता झिकानं महाराष्ट्रातही एंट्री घेतली आहे. त्यामुळे कोरोना संकटात चिंता वाढली आहे.4 / 10झिका विषाणू एडीस इजिप्ती डासामुळे पसरतो. याच डासामुळे डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजार पसरतात. झिकाचा विषाणू आईच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळांमध्ये पसरतो.5 / 10रक्त संक्रमणाच्या माध्यमातून आणि शरीर संबंधांच्या माध्यमातूनही झिका विषाणू पसरतो. झिकाच्या रुग्णांना लगेच ओळखणं अवघड असतं. कारण झिकाच्या लक्षणाची नेमकी व्याख्या अद्याप समोर आलेली नाही.6 / 10एडिस इजिप्ती डास चावल्यानंतर साधारणत: ३ ते १२ दिवसांत झिकाची लागण होते. एडीस इजिप्ती डास चावलेल्यांपैकी ४ पैकी ३ जणांना झिकाची बाधा होते. त्यांना तीव्र ताप, डोकेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास जाणवतो.7 / 10झिकामुळे मायक्रोसेफली नावाच्या आजाराचा धोका निर्माण होतो. हा आजार न्युरोलॉजिकल स्वरुपाचा आहे. यामुळे मुलांचं डोकं लहानच राहतं. मेंदूचा पूर्ण विकास होत नाही.8 / 10मायक्रोसेफली आजार लहान मुलांसाठी जीवघेणा ठरू शकतो. त्यांना आयुष्यभर मेंदूशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.9 / 10झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा. किटकनाशकांचा वापर करावा. 10 / 10सजगता बाळगल्यास झिकाची लागण टाळता येभ शकते. डास चावू नये यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करण्याचा आणि खिडक्या, दरवाज्या बंद ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आणखी वाचा Subscribe to Notifications