five important benefits of saffron Kesar
केसरचे पाच महत्त्वाचे फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 5:43 PM1 / 5केसर हे मिळण्यास अवघड आणि महागडा अशी गोष्ट आहे. अनेक सौंदर्यप्रसाधनं, औषधे आणि खाद्यपदार्थांमध्ये केसरचा उपयोग केला जातो.2 / 5आतापर्यंत जगभरातल्या अनेक अभ्यासक आणि संशोधकांनी केसरवर मोठा अभ्यास केला आणि त्यात असे सिध्द झाले आहे की केसरमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. 3 / 5केसरात असलेल्या काही गुणधर्मांमुळे आपली लैंगिक क्षमता सुधारते, असे सिध्द झाले आहे. त्यामुळे भारतीय परंपरेत रात्री झोपण्यापुर्वी केसरयुक्त दुध पिण्याची पध्दत आहे.4 / 5केसर हे सर्दी-खोकल्यावर अतिशय रामबाण औषध आहे. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास केसर दुधात मिसळुन प्यायले जाते किंवा चिमुटभर केसर कपाळाला आणि छातीला लावले जाते.5 / 5केसरमध्ये निसर्गत:च अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा वापर अनेक औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. या गुणधर्मांमुळे त्वचेचा, केसांचा पोत सुधारतो. साबण, शॅम्पु आणि तेलामध्ये केसरचा उपयोग केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications