हेल्दी राहण्यासाठी 'या' सवयी ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 6:28 PM
1 / 6 उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. वातावरणात बदल होत असल्याने अनेकदा आजारी पडण्याचा धोका हा अधिक असतो. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी आत्मसात करणं गरजेचे आहे. हेल्दी राहण्यासाठी कोणत्या सवयी फायदेशीर असतात ते जाणून घेऊया. 2 / 6 निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा असतो. उन्हाळ्यात फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. फळ्यांमध्ये जीवनसत्व आणि इतर पौष्टीक घटक असल्याने ते शरिरासाठी फायदेशीर ठरतात. 3 / 6 उन्हाळ्यात जास्त तहान लागते. तसेच शरिराला पाण्याची आवश्यकता अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. थंड पेय पिण्याकडे लोकांचा अधिक कल असतो मात्र ती शरिरासाठी घातक ठरू शकतात. 4 / 6 मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कुटुंबीयांसोबत बाहेर फिरण्याचा बेत आखा, मोकळेपणाने चर्चा करा. पुरेशी झोप घ्या. सकारात्मक विचार करा. नेहमी आनंदी राहा. 5 / 6 प्रत्येकाचा काहीना काही छंद असतो. कामामध्ये गुंतून गेल्यामुळे तो हवा तसा जोपासता येत नाही. मात्र धावपळीच्या आयुष्यात थोडीशी विश्रांती घेण्यासाठी छंद मदत करतो. आनंद मिळतो त्यामुळे छंद जोपासा आणि आरामात राहा. 6 / 6 घड्याळ्याचा काट्यासोबत हल्ली सर्वच जण धावत असतात. मात्र या धावपळीत स्वत: कडे लक्ष द्यायला अनेकांना वेळ नसतो. त्यामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र व्यायाम करणं अत्यंत गरजेचे आहे. व्यायामामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आणखी वाचा