शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नसांमधील अशुद्ध रक्त साफ करतात 'या' गोष्टी, डाएटमध्ये नक्की असू द्या समावेश!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:35 AM

1 / 7
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरातील रक्त देखील शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. आता रक्त चांगलं राहावं यासाठी तुमचं लाइफस्टाइल कसं आहे, तुम्ही काय खाता हे खूप महत्वाचं असतं. हेल्थ तज्ज्ञांच्या मते जर डाएटमध्ये आयर्न, विटामीन सी आणि इतर पोषक तत्त्वाचा योग्य प्रमाणात समावेश असेल तर यामुळे लाल रक्त पेशींच्या उत्पादनात वाढ होते. यामुळे शरीरातील रक्ताचा फ्लो देखील सुरळीत राहतो.
2 / 7
हिरव्या पालेभाज्या जसं की ब्रोकोली आणि पालक यात अनेक पोषक तत्व आढळून येतात. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा डाएटमध्ये समावेश असला पाहिजे.
3 / 7
टोमॅटोमध्ये विटीमीन सी सह आयर्न देखील असतं जे रक्ताच्या प्रवाह सुधारण्यासाठी काम करतं. रक्त चांगलं राखण्यासाठी आणि सर्क्युलेशन वाढवण्यासाठी विटामीन सी, तसंच आयर्न मिळून चांगलं काम करतात.
4 / 7
ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरतो. लसणात एलिसीन असतं जे रक्त वाहिन्यांना आराम देण्याचं काम करतात.
5 / 7
आंबट फळांचं सेवन केल्यानं शरीरातील ब्लड सर्क्युलेशन योग्य राहतं. आंबट फळं शरीरातील रक्ताचं सर्क्युलेशनला बूस्ट करतात आणि ब्लड क्लॉटिंगपासून बचाव करतात.
6 / 7
गाजर शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यात मदत करतं. दररोज गाजर खाल्ल्यानं शरीरात प्राकृतिक पद्धतीनं आयर्नचं प्रमाण वाढतं. याशिवाय गाजराचा ज्यूस प्यायल्यानं ब्लड काऊंट लेवल देखील वाढतं.
7 / 7
बीन्स आणि डाळी शरीरात रक्त बनवण्याचं काम करतात. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात भरभरुन आयर्न असतं. तसंच फोलिक अॅसिडचं देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं.
टॅग्स :Healthआरोग्यBlood Bankरक्तपेढी