शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता? आंबा खाल्ल्यावर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी; आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 12:37 PM

1 / 8
आंबा हा फळांचा राजा आहे. आंब्याचा हंगाम येताच आंबाप्रेमींच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद असतो. पण आंबा खाताना थोडी काळजी घेणं देखील गरजेचं आहे, आंबा एक असे फळ आहे, ज्याच्यासोबत काही पदार्थ खाणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.
2 / 8
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोक विचारतात की आंबा खाल्ल्यानंतर काय खावं आणि काय खाऊ नये, आंबे खाल्ल्यानंतर दूध पिणं योग्य आहे का किंवा दह्यासोबत आंबा खाल्ल्याने काय होतं? असं म्हटले जाते की जर कोणत्याही अन्नाचे मिश्रण चुकीचे असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. चव आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असलेल्या आंब्याबाबतही असंच आहे.
3 / 8
प्रत्येकजण उन्हाळ्याच्या हंगामाची वाट पाहत असतो कारण या ऋतूत लोकांना त्यांच्या आवडीचे आंबे खायला मिळतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन बी आणि पोटॅशियम आढळतात, त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत ते जाणून घ्या.
4 / 8
तुम्हाला माहित आहे का आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. आंबा हे असं फळ आहे, जे पचायला वेळ लागतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. आंबा खाल्ल्यावर पाणी प्यायल्याने पोटात दुखणे किंवा छातीत जळजळ होण्याचीही तक्रार होऊ शकते.
5 / 8
अनेक वेळा लोकांना आंबा आणि कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय असते. पण पोटात गेल्यावर याची खतरनाक रिएक्शन होते. कोल्ड ड्रिंक आणि आंबा या दोन्हीमध्ये साखर आढळते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
6 / 8
आंबा खाल्ल्यानंतरही दही खाऊ नये. दही आणि आंबा मिळून तुमच्या पोटात जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या वाढतात. त्यामुळे लगेगच दही खाणं टाळा.
7 / 8
जे काही खावं ते थोडं विचार करूनच खा, असं म्हणतात. उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारलं खाऊ नये, असे केल्यास उलट्या, मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या.
8 / 8
काही लोकांना रात्रीच्या जेवणात आंबा खाणं खूप आवडतं, परंतु यासोबतच तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्यांना छातीत जळजळ आणि छातीत जळजळ होण्याची तक्रार होऊ शकते. मसालेदार अन्न खाल्ल्याने त्वचेवर पुरळ उठू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य