शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जांभळांसोबत चुकूनही खाऊ नये हे 3 पदार्थ, होऊ शकतात या समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 10:02 AM

1 / 6
Foods That Shouldn't Be Eaten With Black Plum : जांभुळ हे एक फारच फेमस आणि आवडीने खाल्लं जाणारं फळ आहे. सगळ्याच वयोगटातील लोक हे फळं चवीने खातात. बालपणी लहान मुलं हे फळं जास्त खातात कारण याने जिभ जांभळ्या रंगाची होत होती. जांभळांचं सेवन आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतं. पण हे खाताना जरा काळजी घेणंही महत्वाचं आहे. जांभळांसोबत काही खास पदार्थ खाऊ नये. कारण त्याने तुम्हाला गंभीर समस्या होऊ शकतात. चला जाणून घेऊ कोणते आहे हे पदार्थ...
2 / 6
जांभळं दिसायला भलेही लहान असतात, पण यात अनेक फायदेशीर तत्व असतात. जे आरोग्यासाठी फार महत्वाचे असतात. या फळामधून शरीराला भरपूर आयरन, कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी मिळतात.
3 / 6
सगळ्यांनी जांभळं खाल्ले पाहिजेत कारण याच्या माध्यमातून ब्लड शुगर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं. तसेच याने दातांची स्वच्छता होते. हिरड्यांमधून येणारं रक्तही याने थांबतं. त्यासोबतच याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पण या फळासोबत खालील तीन पदार्थ खाऊ नये.
4 / 6
यात जराही शंका नाही की, हळक एक आयुर्वेदिक औषधी आहे. जी आपल्या शरीराला अनेक फायदे देते. पण हळद जांभळांसोबत कधीच खाऊ नये. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर रिअॅक्ट करतात. ज्यामुळे पोटदुखी, मळमळ आणि अॅलर्जी होण्याचा धोका राहतो.
5 / 6
जांभळं कधीही दूध किंवा दुधापासून तयार पदार्थांसोबत खाऊ नये. कारण असं केल्याने पोटात गडबड होऊ शकते. असं केलं तर जास्त शक्यता आहे की, तुम्हाला अपचन, गॅस, पोटदुखीची समस्या होऊ शकते.
6 / 6
लोणचं खाल्ल्याने जीभेचे चोचले नक्कीच पुरवले जातात. पण जास्तीत जास्त डायटिशिअन लोणच्याला हेल्दी मानत नाहीत. यापासून शरीराला काहीच फायदे मिळत नसल्याचं ते सांगतात. जर जांभळं खाण्याआधी किंवा नंतर तुम्ही लोणचं खाल्लं तर तुम्हील उलटी, गॅस आणि मळमळ होण्याची समस्या होऊ शकते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य