foods to avoid and never eat in the morning an empty stomach fruit juice vegetables coffee
उपाशीपोटी 'हे' ६ पदार्थ खाल, तर पोटाच्या समस्यांना आमंत्रण द्याल; भोगावे लागतील गंभीर परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:20 AM1 / 9बहुतांश जण सकाळी उठून चहा घेतात. गरमागरम चहा घेत दिवसाची सुरुवात करायला अनेकांना आवडतं. काही जण पोहे, समोसे, ऑम्लेट, फळांचा रस घेऊन दिवस सुरू करतात. पण दिवसाची सुरुवात करताना काळजी घ्यायला हवी. अन्यथा आरोग्य बिघडण्यास सुरुवात होऊ शकते.2 / 9काही पदार्थ खाणं उपाशीपोटी टाळायला हवं. कारण असे पदार्थ आतड्यांचं नुकसान करतात. आपण झोपलेलो असताना पचन यंत्रणादेखील कार्यरत नसते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर किमान २ तासानंतर नाश्ता करायला हवा. काही पदार्थ उपाशी पोटी खाणं टाळायला हवं.3 / 9मसालेदार पदार्थ- मसालेयुक्त पदार्थ उपाशीपोटी टाळायला हवेत. त्यामुळे पोटात ऍसिडिक रिऍक्शन होते. मसाल्यांमुळे अपचनाची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. काही जण सकाळी समोसे, कचोरी, भज्या खातात. त्यांनी हे टाळायला हवं.4 / 9फळांचा रस- दिवसाची सुरुवात फळांचा रस पिऊन करावी असा अनेकांचा विचार असतो. मात्र तज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात. कारण यामुळे जठराग्नीवर अतिरिक्त ताण येतो. फळांमध्ये फुक्टोज असतं. फळांतील शर्करा यकृतावर अतिरिक्त दबाव टाकते.5 / 9दही- दह्यात लॅक्टिक ऍसिड असतं. त्यामुळे पोटातील आम्लाची मर्यादा बिघडते. लॅक्टिक ऍसिडमुळे बॅक्टेरिया मारले जातात. त्यामुळे ऍसिडिटी वाढते. 6 / 9पेर- पेरमध्ये कच्च्या फायबरचं प्रमाण अधिक असतं. उपाशीपोटी पेर खाल्ल्यास पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.7 / 9आंबट फळं- फळं आरोग्यासाठी उत्तम असतात. मात्र ती योग्य वेळी खायला हवीत. उपाशीपोटी फळं खाल्ल्यास ऍसिड तयार होतं. फळांमध्ये फायबर आणि फ्रुक्टोज असतं. उपाशीपोटी फळं खाल्ल्यास पचनतंत्राच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे पेरु, संत्र्यासारखी फळं सकाळी टाळावीत.8 / 9कच्च्या भाजा- कच्च्या भाज्या उपाशीपोटी खाऊ नयेत. कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे रिकाम्या पोटावर अतिरिक्त भार पडतो. यामुळे पोट फुगतं, पोटदुखीची समस्या उद्भवते. 9 / 9कॉफी- अनेकजण कॉफी पिऊन दिवसाची सुरुवात करतात. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यानं ऍसिडिटी होऊ शकते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास पचन यंत्रात हायड्रोक्लॉरिक ऍसिडचा स्राव उत्तेजित होतो. हा स्राव पोटाच्या समस्यांचं कारण ठरू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications