शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Health tips: उन्हाळ्यात हृदयाचं आरोग्य उत्तम रहावं म्हणून सेवन करा 'ही' फळं, रहाल फिट अँड फाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 5:52 PM

1 / 10
उन्हाळ्यात (Summer) ताजी फळं खाल्ल्याने उष्णतेपासून आराम मिळतो. त्यामुळे आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. फळांमध्ये भरपूर पोषक घटक असतात
2 / 10
उन्हाळ्यात हृदय निरोगी (Healthy Heart) राखण्यासाठीही फळांचा फायदा होतो. फळे आपल्याला हायड्रेट ठेवतातच पण इतर आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
3 / 10
ते हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्याचे कार्य करतात. फळांमध्ये भरपूर पाणी आणि फायबर असल्यानं हृदय निरोगी राहतं.
4 / 10
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही टरबूज, आंबा, बेरी आणि पपई इत्यादी फळांचा आहारात समावेश (fruit for summer) करू शकता.
5 / 10
टरबूज टरबूजमध्ये 90 टक्के पाणी असतं. यामध्ये पोटॅशियम, लायकोपीन असे विविध पोषक घटक असतात. ते हृदय निरोगी ठेवतात. टरबूजामुळे रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते. टरबूजाचे रोज सेवन केल्याने हृदय निरोगी राहते.
6 / 10
आंबा हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे एक लोकप्रिय फळ आहे. आंबा हे बहुतेक लोकांच्या उन्हाळ्यातील सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे. आंबा हृदय निरोगी ठेवतो. त्यात फायबर, पोटॅशियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. पोटॅशियम वाढवणे आणि सोडियमचे प्रमाण कमी करणे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आंबा फायदेशीर आहे.
7 / 10
बेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे हृदयविकाराशी संबंधित ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. फायबरने समृद्ध बेरी हृदय निरोगी ठेवतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही बेरीचे सेवन अनेक प्रकारे करू शकता.
8 / 10
पपईमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात. पपईमध्ये पपईन असते. हे हृदय आणि त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. यामुळे जळजळ कमी होते. याशिवाय हे अनेक आरोग्यदायी फायदेही देते.
9 / 10
पीच देखील तुमच्या हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी खूप मदत करतं. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात. यामुळे केवळ हृदय निरोगी राहत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत होते. हे फळ स्वादिष्ट तसेच पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
10 / 10
हृद्य निरोगी राखण्यासाठी फळांचे सेवन करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे आणि खास करून डाळींब आणि अननस यांचे सेवन तुम्ही आवर्जून करायला हवे. ही फळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात आणि हृदयाच्या उत्तम आरोग्याला हातभार लावतात. तर मंडळी म्हणून हे 5 पदार्थ तुम्ही आवर्जून व नियमित खा आणि तुमच्या हृदयाला निरोगी राखा. कारण हृदय निरोगी असले तर तुम्ही सुद्धा उत्तम आणि आरोग्यवर्धक आयुष्य जगाल.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स