शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 10:12 AM

1 / 5
खोकला ही एक अशी समस्या आहे जी सतत डोकं वर काढत असते. खाण्या-पिण्यात बदल, वातावरण बदल अशा इतरही काही वेगळ्या कारणांनी खोकला येतो. खोकला हा पित्त आणि कफ बिघडल्यानेही होतो. काही लोकांमध्ये फुफ्फुसांच्या संक्रमणामुळेही खोकला होतो. आता यावर औषध घेऊनही तुमचा खोकला थांबत नसेल तर काही घरगुती आयुर्वेदिक उपाय तुम्ही करु शकता.
2 / 5
मध - खोकला असेल तर मध चाटल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध नक्की चाटावे. जास्त खोकला असेल तर दिवसातून दोन ते तीन वेळा मध चाटावं. तुम्हाला शक्य असेल तर मध मिश्रित केलेला चहा सुद्धा घेऊ शकता.
3 / 5
हळद- हळद वेगवेगळ्या आजारांवर रामबाण उपाय मानली जाते. खोकलाही त्यातील एक आहे. हळदीमध्ये अॅंटी-इंफ्लेमेट्री आणि अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात, जे खोकला दूर करण्यास मदत करतात. खोकला अधिक असल्यास तुम्ही दुधात हळद टाकून सेवन करु शकता. त्यासोबतच हळदीमध्ये मध टाकूनही तुम्ही सेवन करु शकता.
4 / 5
ज्येष्ठमधचा चहा - ज्येष्ठमध खोकला झाल्यावर फायदेशीर ठरु शकतं. ज्येष्ठमधात अॅंटी-ऑक्सिडेंट असतं जे खोकला कमी करण्यास फायदेशीर ठरतं. यासाठी एक कप गरम पाण्यात ज्येष्ठमधाची मुळं टाका आणि पाणी १० ते १५ मिनिटे गरम होऊ द्या. नंतर ते पाणी थंड करुन प्यावे. दिवसातून दोनदा याचं सेवन केल्यास फायदा होईल.
5 / 5
मिठाच्या पाण्याने गुरळा करा - गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून या पाण्याने गुरळा केल्यास आराम मिळतो. या पाण्याने गुरळा केल्याने घशात आलेली सूजही कमी होते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य