Good news on coronavirus vaccine india covishield trial to get success by serum institute in pune
मेड इन इंडिया लसीच्या चाचणीचे सकारात्मक परिणाम; पुढच्या ७ दिवसात २५ जणांचे लसीकरण होणार By manali.bagul | Published: September 28, 2020 1:47 PM1 / 9कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात लसीबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. आरोग्य मंत्रालयाने आणि आयसीएमआरचे अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा देश या लसींसाठी रांगेत आहेत. ज्यात तीन लसी या एडवांस स्टेजमध्ये आहेत. 2 / 9तीन मेड इन इंडिया लसींपैकी कोविशिल्ड पुण्याचील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून तयार केली जात आहे. बुधवारी पुण्यात स्वयंसेवकांना मेड इन इंडिया लसीचे डोस देण्यात आले होते. 3 / 9हे डोस पुण्यातील भारती विद्यापीठ मेडिकल आणि कॉलेज आणि रुग्णालयामध्ये देण्यात आले होते. गुरूवारी वैद्यकिय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दोन जणांना डोस देण्यात आले तर गुरूवारी अन्य तीन जणांना लसीचे डोस देण्यात आले होते. 4 / 9भारती विद्यापीठ वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार दोन स्वयंसेवकांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसीत करण्यात आलेली लस दिली होती. त्यांची शारीरिक स्थिती चांगली होती. 5 / 9वैद्यकिय चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआईआई) द्वारा निर्मित कोविशिल्डचा पहिला डोज ३२ ते ४८ वर्ष वयोगटातील दोन लोकांना बुधवारी देण्यात आला. आता पुन्हा एका महिन्यानंतर ही लस दिली जाणार आहे. 6 / 9वैद्यकिय महाविद्यालय एवं रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र ओस्वाल यांनी सांगितले की, लस दिलेल्या स्वयंसेवकांची प्रकृती चांगली आहे. लस दिल्यानंतर ताप, अंगदुखी असा कोणताही परिणाम दिूसन आलेला नाही. 7 / 9याशिवाय स्वयंसेवकांना आवश्यक संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. आपातकालीन स्थितीत कोणतीही समस्या उद्भवल्यास आमची वैद्यकिय टीम त्यांच्या मदतीस उपस्थित असेल. 8 / 9अमर उजाला ने दिलेल्या वृत्तानुसार रुग्णालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. संजय ललवानी यांनी सांगितले की, या दोन्ही स्वयंसेवकांना एका महिन्यानंतर पुन्हा एकदा लस दिली जाणार आहे. याशिवाय पुढील ७ दिवसात २५ लोकांना लस दिली जाणार आहे. 9 / 9अमर उजाला ने दिलेल्या वृत्तानुसार रुग्णालयाचे वैद्यकिय संचालक डॉ. संजय ललवानी यांनी सांगितले की, या दोन्ही स्वयंसेवकांना एका महिन्यानंतर पुन्हा एकदा लस दिली जाणार आहे. याशिवाय पुढील ७ दिवसात २५ लोकांना लस दिली जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications