शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

GOOD NEWS : ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनवर मात करण्यास भारतातील कोव्हिशील्ड प्रभावी ठरतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 11:51 AM

1 / 12
कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी ब्रिटनमधील सामान्य लोकांसाठी अधिकृतपणे लसीकरण सुरू केले आहे. ब्रिटन हा कोरोनाचे लसीकरण करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक आहे.
2 / 12
मात्र, कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्यामुळे या लसीकरण मोहिमेचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावरून गायब झाल्याचे दिसून आले.
3 / 12
कोरोनाचा नवीन स्ट्रेन B.1.1.7 संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजवत होता. मात्र, आता त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतात तयार करण्यात आलेली कोरोना लस कोव्हिशील्डमध्ये नवीन स्ट्रेनसोबत लढण्याची ताकद आहे, असा दावा करण्यात आला आहे.
4 / 12
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राजेनेका यांनी खुलासा केला आहे की, भारतातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात आलेली कोव्हिशील्ड लस नवीन स्ट्रेनविरोधात अधिक प्रभावी आहे.
5 / 12
ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या मते, व्हायरसचे मूळ रूप SARS CoV-2 च्या ब्रिटीश व्हेरिएंटच्याविरोधात कोव्हिशील्ड लस सुरक्षेचे समान स्तर प्रदान करते.
6 / 12
युनायटेड किंगडममधील ChAdOx1 लसीच्या आमच्या चाचण्यांमधील डेटावरून असे दिसून आले आहे की, ही लस फक्त कोरोना संकटाच्या मूळ व्हायरसपासून संरक्षण करत नाही, तर नव्या स्ट्रेनविरोधात सुद्धा संरक्षण देते, असे ऑक्सफोर्ड लसीकरणाच्या चाचणीचे मुख्य वैज्ञानिक प्रोफेसर अँड्र्यू पोलार्ड यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
7 / 12
दरम्यान, कोरोनाचा नवीन स्ट्रेन B.1.1.7 संपूर्ण यूकेमध्ये २०२० वर्षाच्या अखेरपर्यंत संक्रमणाचे एक मुख्य कारण बनले होते. संशोधनानंतर वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढलेल्या निष्कर्षांचा अजून आढावा घ्यायचा आहे.
8 / 12
मात्र, संशोधनाच्या सविस्तर विश्लेषणाने असे सिद्ध केले आहे की, लसीचा एकच डोस संसर्ग आणि त्यामुळे पीडित राहण्याचा कालावधी कमी करू शकतो, परिणामी रोगाचा प्रसार कमी होतो.
9 / 12
संशोधकांनी असेही म्हटले आहे की, ते सध्या दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलियन व्हेरिएंटच्या विरोधात लसीची प्रभावशीलता पाहण्यासाठी विश्लेषण करीत आहेत.
10 / 12
जो धोकादायक E484K स्ट्रेन आहे. तसेच, नवीन स्ट्रेनमध्ये B.1.1.7 पासून काय वेगळे आहे, याची तपासणी देखील केली जात आहे.
11 / 12
दरम्यान, भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. सर्वात आधी ही लस कोरोना योद्ध्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.
12 / 12
भारतात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 3 कोटी हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सला लस दिली जाणार आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या