habits you must avoid after a meal
आरोग्य राखायचंय? जेवणानंतर 'या' गोष्टी टाळा By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 3:34 PM1 / 7योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. मात्र जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास त्याचा पचनक्रियेवर विपरित परिणाम होतो. त्याऐवजी जेवणानंतर ४५ मिनिटांनी कोमट पाणी प्या.2 / 7व्यायाम शरीरासाठी चांगला असतो. मात्र जेवणानंतर व्यायाम केल्यास शरीरावर ताण पडतो आणि त्याचा पचन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. 3 / 7धूम्रपान शरीरासाठी घातक असतं. मात्र जेवणानंतर लगेच केलेलं सर्वाधिक धोकादायक असतं. 4 / 7दिवसभर काम करुन थकल्यावर जेवण केलं की लगेच झोप येते. मात्र जेवणानंतर लगेच झोपणं टाळा.5 / 7धावणं हा उत्तम व्यायाम आहे. मात्र जेवणानंतर लगेच धावू नका. जेवणानंतर ४-५ तासांनंतर धावा. अन्यथा पचनाच्या समस्या उद्भवतील.6 / 7जेवणानंतर लगेच वाचन करणं किंवा वाहन चालवणं टाळा. जेवणानंतर शरीरातील बरीचशी उर्जा पचनक्रियेत जाते. त्यामुळे इतर क्रियांसाठी पुरेशी उर्जा मिळत नाही.7 / 7जेवणानंतर त्वरित फळं खाणं टाळा. कारण फळांमध्ये असलेली साखर जेवणातील प्रोटिन्सच्या संपर्कात आल्यावर पचनक्रियेचा वेग मंदावतो. आणखी वाचा Subscribe to Notifications