शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' कारणांमुळे होऊ लागते केसगळती, टक्कल पडण्याआधी वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:19 AM

1 / 8
Hair Loss Causes : वेगाने बदलत्या लाइफस्टाईलचा प्रभाव आपल्या आरोग्यासोबतच आपल्या केसांवरही दिसून येतो. सध्या सगळ्यांनाच केसगळतीची आणि इतर समस्यांचा सामना करावा लागतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी व इतर कारणांमुळे नेहमीच केसगळतीची समस्या होते. पण याची कारणे जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात. ही कारणे माहीत असतील तर यावर योग्य ते उपाय करता येतात.
2 / 8
पोषक तत्वांची कमतरता - सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बिघडत आहेत. अशात शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आरोग्याचं नुकसान होतं. तसेच केसांवरही याचा प्रभाव पडतो. बायोटिनच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात. त्याशिवाय व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ न खाल्ल्याने आणि आयरनच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात.
3 / 8
स्ट्रेस आणि फिजिकल ट्रॉमा - भावनात्मक आणि शारीरिक तणाव टेलोजन एफ्लुवियम नावाच्या स्थितीला ट्रिगर करते. ज्यामुळे केसगळती वाढते. जास्त तणाव घेतल्याने केसगळती वाढते. या स्थितीत फक्त केस करताना आणि केस धुताना केस गळतात.
4 / 8
जेनेटिक्स - अनेकदा केसगळतीचं कारण हे जेनेटिक्स असू शकतं. परिवारात केसगळतीची हिस्ट्रीअसेल तर ही समस्या तुम्हालाही होऊ शकते. या स्थितीला एंड्रोजेनेटिक एलोपेसिया म्हणून ओळखलं जातं. यामुळे जास्तीत जास्त लोकांना टक्कल पडण्याची समस्या होते.
5 / 8
जास्त कंडीशनरचा वापर - जास्तीत जास्त लोक ही चूक करतात. कारण त्यांना असं वाटत असतं की, जास्त कंडीशनर लावल्याने त्यांचे केस जास्त सॉफ्ट होतील. पण असं नाहीये. केसांची लांबी आणि केस कसे आहेत त्यानुसार कंडीशनरचा वापर करावा. आणखी एक चूक लोक करतात. ती म्हणजे लोक शॅम्पूप्रमाणे कंडीशनर लावतात. म्हणजे केसांच्या मुळात. पण कंडीशनर केवळ केसांना लावायचं असतं.
6 / 8
चुकीचा शॅम्पू निवडणे - तुमच्या डोक्याची त्वचा ड्राय किंवा ऑयली असेल, तुमचे केस ड्राय किंवा ऑयली असतील किंवा तुम्हाला डॅंड्रफची समस्या असेल तर योग्य शॅम्पूची निवड केली पाहिजे. तसेच सतत शॅम्पू बदलू नये.
7 / 8
सतत कंगवा फिरवणे - असं मानलं जातं की, रोज केसांमध्ये १०० स्ट्रोक्स असायला पाहिजे. पण हे अवलंबून यावर आहे की, तुम्ही कंगवा कसा फिरवता. कारण ड्राय केसांमध्ये सतत कंगवा फिरवल्याने केस तुटतील. तसेच केसांच्या मुळातही जास्त फ्रिक्शन होतं. ज्याने केस डॅमेज होतात.
8 / 8
स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा जास्त वापर - केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकजण प्रमाणापेक्षा जास्त स्टायलिंग प्रॉडक्ट्सचा वापर करतात. असं केल्याने केस फार जास्त डॅमेज होता. केसगळती आणि तुटण्याची समस्या होऊ लागते.
टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य