hand sanitizer also have cancer causing benzene bottles recall from american market
बापरे! कोरोनापासून बचाव करणाऱ्या हँड सॅनिटायझरपासूनही कॅन्सरचा धोका; जाणून घ्या, नेमकं कसं? By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:11 PM1 / 7शॅम्पूनंतर आता हँड सॅनिटायझरमध्येही कॅन्सर होणारी घातक रसायने आढळून आली आहेत. यामुळेच अमेरिकेतील जवळपास दोन डझन हँड सॅनिटायझर ब्रँड्सने बाजारातून आपलं प्रो़डक्ट परत मागे घेतलं आहे किंवा त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना काळात हँड सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. 2 / 7एप्रिल 2021 ते या वर्षी सप्टेंबर दरम्यान, चीन, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत बनवलेल्या सॅनिटायझरच्या हजारो बाटल्या परत घेण्यात आल्या आहेत. त्यांच्या जेल आणि स्प्रे या दोन्हीमध्ये बेंझिनची धोकादायक पातळी आढळून आली. बेंझिनपासून ल्यूकेमिया कॅन्सरचा धोका असतो.3 / 7एकूण 21 ब्रँडचे हँड सॅनिटायझर्स बाजारातून परत मागे घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये द क्रीम शॉपने बनवलेल्या उत्पादनाचा समावेश आहे. तसेच टीजे मॅक्स, मार्शल्स आणि ऑनलाईन विकल्या गेलेल्या सॅनिटायझर्स आहेत. सॅनिटायझर हाताला लावले जाते तेव्हा त्यात असलेले धोकादायक बेंझिन त्वचेद्वारे शरीरात जातं.4 / 7बेंझिनचे उच्च प्रमाण आढळले आहे. अशा परिस्थितीत लोकांना कॅन्सरचा धोका असू शकतो. काही विदेशी उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अनेक हँड सॅनिटायझर्स बेंझिन मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळले. कोरोना महामारीच्या काळात जगभरात सॅनिटायझर्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. 5 / 7जवळपास तीन वर्षांनंतर सॅनिटायझर्समध्ये बेंझिनची पातळी जास्त असल्याचे आढळून आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सॅनिटायझरमध्ये बेंझिनपासून बनवलेले रसायन वापरले जाते, ज्यामध्ये काहीवेळा कमी प्रमाणात कार्सिनोजेन असू शकतात.6 / 7काही दिवसांपूर्वी अनेक कंपन्यांनी विकल्या जाणाऱ्या ड्राय शॅम्पूमध्ये बेंझिनची पातळी खूप जास्त असल्याचे आढळून आले होते. यामुळे युनिलिव्हरने ऑक्टोबरमध्ये बाजारातून आपले उत्पादन परत मागवले होते. कनेक्टिकटमधील एका प्रयोगशाळेत ड्राय शॅम्पूच्या 34 ब्रँडच्या 148 बॅचचा अभ्यास करण्यात आला.7 / 7ज्यामध्ये असे आढळून आले की त्यापैकी 70% मध्ये बेंझिन आहे. या रसायनामुळे ल्युकेमियासारखा कॅन्सर होऊ शकतो. बेंझिनचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. जग अद्यापही कोरोनाच्या संकटाचा सामना करत असल्याने सॅनिटायझर्सचा वापर आताही केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications