शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्त्रीयांसाठी धुम्रपान कसे ठरते घातक, वाचा आणि तुम्हीच ठरवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 17:31 IST

1 / 6
धुम्रपानामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंच. पण त्याहीपेक्षा धुम्रपान करणाऱ्या स्त्रियांना इतरही विकारांचा सामना करावा लागतो. तारूण्यात स्त्रियांना धुम्रपानाचा त्रास जाणवत नाही, पण उतारवयात गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच स्त्री असो वा पुरूष, जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर तुम्हाला वेळीच सावधान होण्याची गरज आहे.
2 / 6
1) दृष्टि कमी होणे - धुम्रपानामुळे स्त्रियांची दृष्टी लवकर जाण्याचा धोका असतो. तसंच पन्नाशीनंतर डोळ्यांचे विविध विकारही होण्याची शक्यता असते
3 / 6
2) दाताच्या तक्रारी - सिगरेटमधील तंबाखूमुळे दातांचं आरोग्य बिघडू शकतं. तसंच हिरड्या, दात, जीभ यांचे विकार होऊन त्यांच्या तक्रारी वाढू शकतात.
4 / 6
3) अर्भकावर परिणाम - हल्लीच्या काळात स्त्रियांचंही धुम्रपान करण्याचं प्रमाण जास्त दिसून येतय. पण या व्यसनामुळे भविष्यात त्यांच्या अर्भकावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
5 / 6
4) हदयावर परिणाम - धुम्रपानामुळे श्वसनाचे विकार होतात व ह्रदयावर ताण येतो. तसंच स्त्रियांनी सिगरेटचं अति प्रमाणात सेवन केल्याने ह्रदयाच्या ठोक्यांचा वेग अनियमित होऊन विविध विकारही होतात.
6 / 6
5) नैराश्य - धुम्रपानामुळे स्त्रियांना नैराश्याचा त्रास होतो. आणि ताण तणावाला सामोरं जावून मानसिक अस्थिरता येते.
टॅग्स :Smokingधूम्रपानWomenमहिलाfoodअन्न