शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Piles : ना औषधं ना सर्जरी, तज्ज्ञांनी सांगितले 7 घरगुती उपाय; पाइल्सची समस्या झटपट होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 3:18 PM

1 / 10
मुळव्याध किंवा पाइल्स (Piles) एक गंभीर समस्या आहे. जी खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीशी संबंधित आहे. तुम्ही जर नेहमीच जास्त तेल, मसाले, मैदा आणि जड पदार्थ खात असाल तर तुम्हाला ही समस्या सहजपणे होऊ शकते. तसेच तुम्हालाही सतत बसून काम करावं लागत असेल आणि कोणत्याही प्रकारची फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तरीही तुम्हाला ही समस्या होऊ शकते.
2 / 10
पाइल्सची सुरूवात बद्धकोष्ठतेपासून होते. भरपूर प्रमाणात पाणी न पिणे आणि पचनक्रिया खराब असणं याचं मुख्य कारण आहे. बद्धकोष्ठता जर वेळीच दूर झाली नाही तर ही समस्या पुढे पाइल्सचं रूप घेते. पाइल्स दोन प्रकारचा असतो. एक ज्यात मलद्वारात वेदना देणाऱ्या गाठी होतात, पण त्यातून रक्त येत नाही. तर दुसरा प्रकार म्हणजे ज्यात जखमा मलद्वाराच्या आत असतात आणि त्यात वेदनांसोबत रक्तही येतं.
3 / 10
हावर्ड मेडिकल स्कूलमध्ये मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यपक डॉ. हॉवर्ड लेविन म्हणाले की, पाइल्स ही समस्या जीवघेणी नाही. पण यावर उपचार आवश्यक आहे. मेडिकलमध्ये पाइल्सवर अनेक उपचार आहेत. पण तुम्ही काही घरगुती उपायांनीही ही वेदनादायी समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊ की, हार्वर्ड हेल्थनुसार या करावं.
4 / 10
सिट्स बाथ घ्या - पाइल्समध्ये होत असलेली खाज आणि जळजळ यापासून सुटका मिळवण्यासाठी सिट्स बाथ घ्यावी. त्यासाठी एका टबमध्ये तीन ते चार इंच गरम पाणी घ्या आणि त्यात 10 ते 15 मिनिटांसाठी बसा. हे नियमितपणे करा याने तुम्हाला फायदा होईल.
5 / 10
फायबरचा आहार - पाइल्स किंवा बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी आपल्या आहारात फायबरने युक्त भरपूर पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला विष्ठा पास करण्यास मदत मिळेल, ज्यामुळे पाइल्समधील रक्तस्त्राव आणि सूज कमी करण्यास मदत मिळते.
6 / 10
क्रीममुळेही मिळतो आराम - तुम्ही ओवर-द-काउंटर क्रीमचा वापर करू शकता. याने सूज आणि खाजेतून आराम मिळेल. विज हेजल आरामदायक क्रीम आहे. ज्यात लिडोकेन, हाइड्रोकार्टिसोन, फिनाइलफ्राइन यांचा समावेश आहे.
7 / 10
योग्य पद्धतीने बसा - टॉयलेटमध्ये जास्त वेळासाठी बसण्याचा प्रयत्न करू नका. याने स्थिती आणखी जास्त बिघडू शकते. नेहमी बसताना एक पायरी असलेल्या किंवा पाय ठेवायची सोय असलेल्या स्टूलचा वापर करा. याने वेदनेतून आराम मिळतो आणि पोट साफ होण्यास मदत मिळते.
8 / 10
स्वच्छतेची काळजी घ्या - दरवेळी संडासहून आल्यावर मलद्वार बेबी वाइप किंवा गरम पाण्याच्या कापडाने हळूहळू साफ करा. जर तुम्हाला नंतर जळजळ होत असेल तर पेट्रोलिअम जेली किंवा अॅलोवेरा जेल लावा.
9 / 10
भरपूर पाणी प्या - रोजच्या आहारात फायबर असलेल्या फळांचा, भाज्यांचा आणि पदार्थांचा समावेश करा. त्याशिवाय चांगल्याप्रकारे हायड्रेटेड रहा. तुम्ही रोज सात ते आठ ग्लास पाणी प्यावं.
10 / 10
एक्सरसाइजही आहे गरजेची - डॉक्टरांनी सांगितलं की, पाइल्सचं मुख्य कारण बद्धकोष्ठता असते आणि ही समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज करा. तुम्हाला वेळ काढून आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे एक्सरसाइज करावी लागेल.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स