health benefits of corn
खाल मका तर टळेल कायमचा आरोग्याचा धोका, फायदे इतके की नुसता मकाच खाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 3:28 PM1 / 10पावसाळा सुरु झाला की बाजारात मक्याच्या कणसांची रेलचेल सुरु होते. हिरवट-पिवळस सालं असलेली मक्याची कणसं अनेकांची लक्ष वेधून घेतात. धो-धो कोसळणाऱ्या पावसात लिंबू-मीठ लावून भाजलेली कणसं खाणं हा अनेकांच्या आवडतीचा कार्यक्रम असतो. त्यामुळे खासकरुन पावसाळ्यात मक्याच्या कणसांना जास्त मागणी असते. परंतु, सध्याच्या काळात बाराही महिने ही कणीस सहज उपलब्ध होत असतात. विशेष म्हणजे ही कणीस खाण्याचे काही फायदे आहेत. त्यामुळे चला तर मग आज जाणून घेऊयात मक्याचे कणीस खाण्याचे काही फायदे.2 / 10मका हे आपल्या आहारात अनेक पोषक घटकांचा समावेश करते. यात ७० ते ७५% स्टार्च, ८ ते १० %प्रथिने, ४ ते ५%, फॅट असते.3 / 10मका हा हाडांना बळकटी देतो. मक्यामध्ये आर्यन, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. तसेच यात झिंक आणि फॉस्फरस देखील असते. हे आपल्या हाडांच्या आजारांपासून आपला बचाव करतात. पि4 / 10हिमोग्लोबिन अथवा शरीरात रक्ताची कमतरता असेल तर उकडलेले मक्याचे कणीस फायदेशीर ठरते. त्यामुळे जर दर महिन्यात किमान एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे. याने पोटही मजबूत होते.5 / 10बऱ्याच जणांना पित्ताचा आणि वाताचा त्रास असतो, अशा व्यक्तींनी मक्याचे कणीस उकडताना त्यात चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून उकडून खावे. यामुळे वात आणि पित्त विकार नियंत्रणात येतो.6 / 10मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.7 / 10अनेकांना पावसात सर्दीचा त्रास जाणवू लागतो अशावेळी मक्याचे दोन तुकडे करुन त्याचा सुगंध घेतल्यास सर्दी देखील कमी होते.8 / 10मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते.9 / 10मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.10 / 10अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications