शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या १० रोगांपासून बचाव करतात हे ५ फळं, रक्ताचीही कमतरता करा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:59 AM

1 / 5
हिरवं सफरचंदामध्ये लाल सफरचंदाच्या तुलनेत अधिक जास्त शुगर आणि फायबर असतं. तुम्हाला डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी, फुफ्फुसाच्या कॅन्सरची शक्यता २१ टक्के कमी करणे, वाढत्या वयाचा प्रभाव रोखणे, रक्त शुद्ध करणे, हाडांना मजबूत करणे आणि मेटाबोलिज्म वाढण्याची मदत मिळते.
2 / 5
सीताफळ हे असं फळ आहे ज्यात वजन वाढवण्याची क्षमता भरपूर असते. यात अॅंटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात. व्हिटॅमिन सी मध्ये शरीरातील रोगांशी लढण्याची शक्ती म्हणजेच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची क्षमता असते. यातून मोठ्या प्रमाणात एनर्जीही मिळते. या खाल्याने थकवा आणि मांसपेशींच्या समस्येपासून सुटका मिळते.
3 / 5
द्राक्ष खायला सर्वांनाच आवडतात. महत्त्वाची बाब म्हणजे याने अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यात कॅलरी, फायबर आणि व्हिटॅमिन सी, ई हे तत्व अधिक प्रमाणात असतात. त्यासोबतच याक ग्लूकोज, मॅग्नेशिअम आणि सायट्रिक अॅसिडसारखे पोषक तत्वही असतात. हे फळ डायबिटीज असणाऱ्यांसाठी फार फायदेशीर आहे. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी द्राक्षाचा रस घेतल्यास फायदा होतो.
4 / 5
पेर या फळामध्ये असलेल्या खनिज, व्हिटॅमिन आणि आर्गेनिक कंपाऊंड हे तत्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात फायबर अधिक प्रमाणात असतं. त्यासोबतच आयर्न अधिक प्रमाणात आढळतं जे हिमोग्लोबिन वाढवतं. तसेच यातील काही घटकांच्या मदतीने बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत होते.
5 / 5
एका शोधानुसार, पेरूचे पाने अल्फा-ग्लूकोसायडिस एंजाइमच्या प्रक्रिये द्वारे रक्तातील शुगर कमी करतात. दुसरीकडे सुक्रोज आणि लॅक्टोज ओढून घेण्यापासून शरीराला रोखतं ज्याने शरीरातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी पेरूच्या पानांचं चूर्ण खावं.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सfruitsफळे