शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थकवा पळवण्यासाठी सकाळी प्या 'ही' हेल्थ ड्रिंक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 3:15 PM

1 / 9
1. नारळ पाणी - दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी पिणे हा आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक उत्तम आणि पौष्टिक असा पर्याय आहे. नारळाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात मिनरल्स असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत होते. दिवसाची सुरुवात करताना नारळ पाणी प्यावे. पण यामध्ये कोणत्याही अन्य साम्रगी मिसळू नये.
2 / 9
2. भाज्यांचा रस - आपल्या दिवसाची सुरुवात करताना भाज्यांचा रसाचे सेवन करावे. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांचा यामध्ये समावेश करावा. पालक, पुदीना यांसारख्या हिरव्या पाल्यांचा ज्यूस प्यायल्यास थकवा जाणवत नाही.
3 / 9
3. गोजी बेरी - गोजी बेरी फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅन्टीऑक्सिडेंट्स आणि 8 प्रकारचे अमिनो अॅसिड असतात. नियमित स्वरुपात गोजी बेरीच्या एका ग्लासाचे सेवन केल्यास थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.
4 / 9
4. लिंबू पाणी - सकाळी तुम्ही लिंबू पाणी पित असाल, तर तुमचे संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असल्यानं शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळते.
5 / 9
5. ग्रीन टी - ग्रीन टीच्या सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ग्रीन टीमुळे शरीरातील मेटाबॉलिझमचा स्तर वाढण्यास मदत होते आणि फॅट्सही बर्न होतात.
6 / 9
6. कोरफडीचा ज्यूस - सकाळच्या वेळेत कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राहण्यात मदत होते. यातील अॅन्टी इन्फ्लेमेटरी तत्वामुळे वेदना, तणाव आणि थकवा दूर होतो.
7 / 9
7. आवळ्याचा ज्यूस - आवळ्याच्या ज्यूस प्यायल्याने संपूर्ण शरीर डिटॉक्स होते. यामुळे मेटाबॉलिक रेटदेखील वाढतो आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहता. सोबत रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
8 / 9
8.जिऱ्याचे पाणी - जिऱ्याच्या पाण्यामुळेही आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यामुळे शरीर हाइड्रेटेड राहते. नियमित याचे सेवन केल्यास चांगली झोपदेखील मिळते.
9 / 9
9. कोमट पाणी - सॉफ्ट ड्रिंकऐवजी कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. यामुळे शरीरातील ऊर्जादेखील वाढते आणि पचनप्रक्रियादेखील सुधारण्यास मदत होते.
टॅग्स :Ayurvedic Home Remediesघरगुती उपायHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स