शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुधी भोपळा खाण्याचे इतके फायदे वाचून रोज खाल याची भाजी, डॉक्टरकडेही जाणं विसराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 5:22 PM

1 / 9
दुधी भोपळ्याची भाजी खाणं अनेकजण टाळतात. ते ही भाजी घेणं किंवा खाणं टाळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुमचं वजन कमी करण्यासोबतच तुमचा आळसही दूर करते. आम्ही दुधी भोपळ्याचे अनेक फायदे तुम्हाला सांगणार आहोत, जे वाचून तुम्ही ही भाजी खाणं कधी टाळणार नाही.
2 / 9
1) ताजेपणा - दुधी भोपळ्याची भाजी ही हलकी मानली जाते. जी खाल्ल्याने पोटात जडपणा वाटत नाही, तसेच ही भाजी खाल तर शरीरात ताजेपणा कायम राहतो. इतकंच नाही तर ताजेपणासाठी मीठ आणि मसाला टाकून याचा ज्यूसही सेवन करू शकता.
3 / 9
2) वजन कमी करा - दुधी भोपळ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याने तुम्हाला वजन वेगाने कमी करण्यास मदत मिळते. ही भाजी तुम्ही नुसतं मीठ टाकून उकडूनही खाऊ शकता किंवा ज्यूस घेऊ शकता.
4 / 9
3) पचन - दुधी भोपळा पचनासंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. सोबतच अॅसिडिटीही दूर केली जाते. तसेच दुधी भोपळ्याने पचनासंबंधी समस्याही दूर होतात.
5 / 9
4) डायबिटीस - डायबिटीसच्या रूग्णांसाठी दुधी भोपळ्याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. डायबिटीसमध्ये रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचं सेवन करणं चांगलं असतं.
6 / 9
5) यूरिनरी डिसऑर्डर - यूरिनरी डिऑर्डर म्हणजे लघवीसंबंधी समस्यांमध्ये दुधी भोपळा फार फायदेशीर ठरतो. याने शरीरातील सोडियमचं प्रमाण कमी केलं जातं. ते लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतं.
7 / 9
6) नॅच्युरल ग्लो - दुधी भोपळ्याचं नियमितपणे सेवन केलं तर त्वचेवर नॅच्युरल ग्लो येतो. त्वचे तजेलदार दिसते.
8 / 9
7) कोलेस्ट्रॉल - दुधी भोपळ्याच्या भाजीचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी होतं. याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. याचा ज्यूस एक आदर्श पेय मानला जातो.
9 / 9
7) कोलेस्ट्रॉल - दुधी भोपळ्याच्या भाजीचं नियमित सेवन केलं तर शरीरातील कोलेस्ट्रॉल सहजपणे कमी होतं. याने कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते. याचा ज्यूस एक आदर्श पेय मानला जातो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य