health benefits of neem
कडुलिबांचे फायदे वाचाल तर रोजच उपयोग कराल, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून होईल बचाव By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 5:26 PM1 / 10कडुलिंब हे एक अद्भुत औषध आहे. त्याची पाने, बिया आणि फुले सर्व औषधी आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी कडुलिंब चांगले असल्याचे आयुर्वेदाचेदेखील म्हणणे आहे. कडुलिंब अँटी-बॅक्टेरियल, अँटी-पॅरासाईट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आहे.2 / 10कडुलिंबाच्या पानांचा रस काही दिवस नियमित प्यायल्याने शरीरातील रक्त शुद्धीकरणास मदत होते. तसेच पोट असल्यामुळे घशाला जो त्रास होतो त्यापासूनही कडुलिंब तुमची सुटका करते.3 / 10सकाळी रिकाम्यापोटी कडुलिंबाची 10 पाने कुटून पाण्यात टाकून प्यायल्याने तुमची बद्धकोष्ठतेचि समस्या दूर होते. तसेच कडुलिंबाची सुकलेली पाने गंधक टाकून जाळल्याने घरातील झुरळं आणि डास नाहीसे होतात.4 / 10कडुलिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, कोरडी त्वचा, सुरकुत्या कमी करण्यास मदत करते, मृत पेशी काढून टाकते आणि नवीन पेशींना प्रोत्साहन देते. त्यामुळे कडुलिंबाच्या साबणाने आंघोळ करणाऱ्या लोकांची त्वचा मऊ आणि तरुण दिसते.5 / 10कोंड्याची समस्या, कोरडे केस, गुंता, खाज सुटणे, केस गळणे, केस पातळ होणे, केस तुटणे या सर्व समस्यांवर कडुनिंब उत्तम उपाय आहे. कडुलिंबाच्या पावडरमध्ये थोडे पाणी घालून केसांच्या मुळांपर्यंत शॅम्पू म्हणून लावा. 2-3 तास ठेवल्यानंतर पाण्याने दुवा. याचा तुमच्या केसांना खूप फायदा होईल.6 / 10कडूलिंबामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकचा हानिकारक प्रभाव थांबवू शकतात, त्यामुळे शरीरामध्ये कॅन्सर होण्याचा धोका टळतो. त्याशिवाय कडूलिंब हृदयरोगासाठीही रामबाण इलाज आहे.7 / 10कडुलिंबाच्या तेलाचा वापर केसांना निरोगी ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. हे कडुलिंबात मुबलक प्रमाणात असते. ज्यांना लांब केस हवे आहेत आणि ते लवकर वाढू इच्छितात त्यांनीच कडुलिंबाचे तेल वापरावे.8 / 10कडुलिंबाच्या तेलाचा वापर केसांना निरोगी ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई आवश्यक आहे. हे कडुलिंबात मुबलक प्रमाणात असते. ज्यांना लांब केस हवे आहेत आणि ते लवकर वाढू इच्छितात त्यांनीच कडुलिंबाचे तेल वापरावे.9 / 10तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे युरिन इन्फेक्शन झाल्यास, तुम्ही कडूलिंबाचं सेवन केलंत तर तुम्हाला लवकरच आराम मिळेल. त्यासाठी रोज सकाळी उठून कडूलिंबाची 4 ते 5 पानं चावून खा. आराम मिळेल.10 / 10कडूलिंबाच्या पानांमध्ये एजिंग समस्येवर तोडगा आहे. हे यावरही एक चांगलं औषध आहे. वास्तविक कडूलिंबाची पानं ही तुमचं वय वाढवण्याची प्रक्रिया कमी करतं आणि त्यामुळे तुमची त्वचा ही तुकतुकीत राखण्याचं काम कडूलिंबाची पानं करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications