शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डायबिटीस आणि हृदयरोगाचा धोका कमी करते पालक भाजी, फायदे वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 2:59 PM

1 / 11
Health Benefits Of Spinach: पालकाची भाजी ही सगळ्यात पौष्टिक भाजी मानली जाते. कारण यात अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पालकाची भाजी शारीरिक आरोग्यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अशात पालक भाजीचं नियमित सेवन केल्याने शरीराला काय काय फायदे मिळतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 11
पालक भाजीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. कारण यात अल्फा लिपोइक अॅसिड असतं, जे इन्सुलिन सिक्रीशन वाढवतं.
3 / 11
पालकमध्ये फायबर, आयर्न आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि याद्वारे शरीराचा थकवा दूर करण्यास मदत मिळते.
4 / 11
पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि लूटिनसारखे महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
5 / 11
पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. हाडांसंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो.
6 / 11
पालक भाजीमध्ये फायबर भरपूर असतं. जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. सोबतच बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
7 / 11
पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचा चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. या तत्वांमुळे त्वचा चमकदार दिसते.
8 / 11
पालक भाजीमध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांच्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते.
9 / 11
पालकमध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं, जे हृदयासाठी फायदेशीर असतं. याने हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो.
10 / 11
पालक भाजीमध्ये फोलेट असतं, जे डिप्रेशन आणि स्ट्रेस लेव्हल कमी करण्यास मदत करतं.
11 / 11
पालक भाजीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य